टाकरखेड वायाळ येथे महिला शेतीशाळा वर्ग क्र. ४ व पोखरा अंतर्गत विविध कृषी योजनांची माहिती कार्यक्रम संपन्न
टाकरखेड वायाळ :
(रामकिसन वायाळ)
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध कृषी योजनांची माहिती व महिला शेतीशाळा वर्ग क्रमांक – ४ मौजे टाकरखेड वायाळ, तालुका देऊळगाव राजा येथे यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी देऊळगाव राजा श्री भगवान कछवे, मंडळ कृषी अधिकारी श्री अनंता अंभोरे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री प्रणव वाघ तसेच समूह सहाय्यक श्री सागर सौदर उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी पोखरा योजनेअंतर्गत विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती तसेच महाविस्तार AI बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. महिला शेतीशाळेच्या दरम्यान हरभरा पिकावरील घाटे अळी व्यवस्थापन, हरभरा पिक व्यवस्थापन तसेच इतर महत्त्वाच्या शेती विषयांवर तज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान व कीड व्यवस्थापनाबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली. कार्यक्रमास सरपंच सौ. संगीता गजानन वायाळ, उपसरपंच खरात, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम कृषी समिती सदस्य तसेच महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभागांतर्गत सहाय्यक कृषी अधिकारी श्री प्रणव वाघ यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषीताई मंगला वायाळ आणि समूह सहाय्यक श्री सागर सौदर यांनी विशेष प्रयत्न केले.