शिवसेना नेते योगेश भाऊ जाधव मित्रमंडळाच्या वतीने खासदार चषकाचे उत्कृष्ट आयोजन : साखरखेर्ड्याचा प्रहार संघ खासदार चषकाचा मानकरी : विजेत्या संघांना रोख बक्षिसांचे वितरण
🔸असलम अंजुम🔸
साखरखेर्डा : (दि.३१ जानेवारी)
शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून येथे प्रथमच शिवसेना नेते योगेशभाऊ जाधव आणि महेंद्रभाऊ पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित “खासदार चषक” क्रिकेट स्पर्धेचा आज बक्षिस वितरण समारोहाने यशस्वी समारोप झाला. अंतिम सामन्यात संविधान इलेव्हन संघ, जळगांव जामोदला नमवून साखरखेर्डा येथील प्रहार क्रिकेट संघ हा विजेता ठरला. दि. २५ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते थाटात उदघाटन झालेल्या या स्पर्धेत एकूण २४ संघांनी भाग घेतला होता. जवळपास एक आठवडाभर चाललेल्या या टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांच्या शेवटच्या दिवशी आज सकाळी अंतिम सामने खेळण्यापूर्वी प्रारंभी स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी विजेत्या संघ आणि उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिके वितरण करण्यात आली. या क्रिकेट स्पर्धेतील प्रथम बक्षिस प्रहार क्रिकेट संघाने पटकविला. शिवसेना नेते योगेश जाधव यांच्या वतीने त्यांच्या पत्नी सौ. अमृताताई जाधव यांच्या हस्ते ₹ १ लाख १ हजाराचे पहिले बक्षिस आणि स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा प्रहार संघाला प्रदान करण्यात आली, द्वितीय बक्षिस उपविजेता संविधान इलेव्हन क्रिकेट संघ, जळगाव जा. ला माजी सरपंच महेंद्र पाटील यांच्या हस्ते ₹ ५१ हजार, तृतीय बक्षिस ₹ ३१ हजार रियांश फार्मा इलेव्हन संघाला माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल यांच्या हस्ते, तर चतुर्थ बक्षिस ₹ २१ हजार युवासेना अध्यक्ष संदीप मगर यांच्या हस्ते बजरंगी राजे संभाजी संघास प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज, संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज – गोलंदाज आणि उत्कृष्ट झेल तसेच इतर प्रोत्साहनपर बक्षिसेही यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. विमान दुर्घटनेत अजितदादांचे अकाली निधन झाल्याने बक्षिस वितरण समारोह अगदी साध्या पद्धतीने आयोजित करुन त्यात स्व. दादांना श्रद्धांजली म्हणून वजेत्यांना ट्रॉफीऐवजी स्व.अजितदादा पवार यांची प्रतिमा भेट देण्यात आल्या. या टूर्नामेंटचे मुख्य आयोजक शिवसेना नेते योगेश भाऊ जाधव हे स्व. अजितदादा पवार यांच्या अंत्यविधीसाठी बारामतीला गेले असल्याने या कार्यक्रमास त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता वहिनी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच त्यांच्या समवेत शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सौ. मायाताई म्हस्के, माजी सरपंच सौ. पुनम महेंद्र पाटील, अश्विनीताई संतोष राजपूत, महेंद्र पाटील, जिप चे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, गंभीरराव खरात, जीवनसिंग राजपूत, राजू ठोके, गोपालसिंग राजपूत, रामदाससिंग राजपूत, रफीक तांबोळी, कमलाकर गवई, चंद्रशेखर शुक्ल, दाऊद कुरेशी, सुनील रिंढे पाटील, विक्की जगताप, युवासेनेचे संदीप मगर, नंदू दसरे, आबेद पठाण, अकबर बॉस, सरपंच अशोक खरात, मुजफफर सिद्दीकी, दत्ता लष्कर, समाधान राजगुरू, डी. एन. पंचाळ, रामदास आव्हाळे, शिवा लहाने, दामू अण्णा शिंगणे, चरणसिंग, प्रफुल्ल शेळके, गणेश खरात, संतोष जगताप, भगवान लष्कर, दिलीप खंडारे, राजू डुकरे, दिलीप सौभागे, कौसर शेख, गुड्डू पठाण, प्रतीक तायडे, बाबा तिवारी, सन्नी पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व सामान्यांचे युट्यूबवर थेट प्रक्षेपण या “खासदार चषक” क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामान्यांचे एनजे स्पोर्ट्स आणि एसीएन च्या माध्यमातून युट्युबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले व त्याला जोड म्हणून आरजे सोनुने, सुधीरसिंग राजपूत आणि अरुण देशमुख यांनी केलेल्या उत्कृष्ट कमेन्ट्रीने ग्राऊंड तसेच युट्यूबवरील प्रेक्षकांची अक्षरशः मने जिंकली तर अम्पायर म्हणून विशाल गवई, मंगेशसिंग राजपूत, डॉ. गणेश देशमुख, गजानन शिराळे यांनी नि:पक्ष कामगिरी बजावल्याने त्यांचे व समालोचकांचे सर्वच क्रिकेटप्रेमीकडून कौतुक करण्यात येत असून साखरखेर्ड्यात पहिल्यांदाच असे भव्य क्रिकेटचे सामने यशस्वीरित्या आयोजित करुन ते शांततेत पार पाडल्याबद्दल आयोजन समितीचेही अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान या क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला, जळगांव खान्देश, भुसावळ, फैजपूर, नेवासा, नगर, शिवनी, अकोट, रिसोड, अमडापूर येथील नामांकित खेळाडूंनी हजेरी लावल्याने प्रेक्षकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. एकंदरीत साखरखेर्डा सारख्या ग्रामीण भागातील ग्राऊंडवर क्रिकेट रसिकांना आठवडाभर राज्यस्तरीय टूर्नामेंट बघण्याची सुवर्णंसंधी मिळून खेळाच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले.