Home Breaking News लोणारच्या मयुरी राऊतने घडवला आंतरराष्ट्रीय विक्रम “प्राईम द इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ स्किलच्या...

लोणारच्या मयुरी राऊतने घडवला आंतरराष्ट्रीय विक्रम “प्राईम द इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ स्किलच्या विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी”

20

लोणारच्या मयुरी राऊतने घडवला आंतरराष्ट्रीय विक्रम

“प्राईम द इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ स्किलच्या विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी”

🔸असलम अंजुम 🔸

साखरखेर्डा : (दि.२८ जानेवारी )

लोणार येथील प्राईम द इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ स्किल या कौशल्य विकास संस्थेतील विद्यार्थिनी मयुरी महेश राऊत हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय विक्रम नोंदवत लोणारसह महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला आहे.तिने येथे मेमरी पॉवर कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. संस्थेचे संस्थापक व संचालक फिरोज शेख यांनी तिला मार्गदर्शक व मेंटॉर म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेत दिले जाणारे कौशल्याधारित, प्रात्यक्षिक आणि आधुनिक प्रशिक्षण यामुळेच हा आंतरराष्ट्रीय विक्रम शक्य झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मयुरीने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश संपादन केले आहे.

मयुरी राऊत हिने इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड – वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ एक्सलन्स (International Book of Records – World Records of Excellence) या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये आपले नाव नोंदवले आहे. “सर्व आशियाई देश व त्यांच्या राजधानी अतिशय कमी वेळेत अचूकपणे सांगणे” या प्रकारात तिने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

२८ सेकंद ३६ सेंटिसेकंदात विक्रम
२९ ऑगस्ट २०२५ रोजी लोणार (महाराष्ट्र) येथे झालेल्या चाचणीत मयुरीने अवघ्या २८ सेकंद आणि ३६ सेंटिसेकंदात सर्व आशियाई देश व त्यांच्या राजधानी अचूक सांगून हा विक्रम केला. त्यावेळी तिचे वय १५ वर्षे २ महिने २२ दिवस इतके होते.
या ऐतिहासिक यशाबद्दल आयोजित अभिनंदन कार्यक्रमात प्रकाश भाऊ मापारी, अ‍ॅड. रिजवान जड्डा, शेख समद, निसार शेख सर, दहातोंडे सर, मनसब खान सर, तौफिक सर तसेच अ‍ॅड. भास्करराव संगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी मयुरीच्या यशाचे कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शेतकरी कुटुंबातून जागतिक व्यासपीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

मयुरी राऊत ही टिटवी, ता. लोणार येथील रहिवासी आहे. तिचे वडील महेश राऊत हे शेतकरी असून आई सुनिता महेश राऊत गृहिणी आहेत. साध्या परिस्थितीतून येऊनही मोठी स्वप्ने उराशी बाळगून मयुरीने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली क्षमता सिद्ध केली आहे.

Copyright ©