Home Breaking News साखरखेर्डा येथील लकी बहुउद्देशीय संस्था राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

साखरखेर्डा येथील लकी बहुउद्देशीय संस्था राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

30

साखरखेर्डा येथील लकी बहुउद्देशीय संस्था राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

🔸असलम  अंजुम 🔸

साखखेर्डा: (दि. २६ जानेवारी) भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भुसावळ येथील
अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार साखरखेर्डा येथील लकी बहुउद्देशीय संस्थेला भुसावळ येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या कार्यास गती आणि प्रेरणा मिळावी या उद्देशाने भुसावळ येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न गुणगौरव पुरस्कार प्रदान केले जातात. यासाठी राज्यभरातून शैक्षणिक, सामाजिक तथा सांस्कृतिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येथील लकी बहुउद्देशीय संस्थेला हा पुरस्कार बहाल करण्यात आला. लकी बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव सौ.राजकीरण अमोल गवई यांनी अनुश्री बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई इंगळे यांच्या हस्ते सदरहू पुरस्कार स्विकारला. यावेळी भुसावळच्या मनपा अध्यक्ष सौ.गायत्रीताई भंगाळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी अहिरे, भुसावळ मनपा चे गटनेते उल्हासभाऊ पगारे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्विय सहायक वर्षाताई लोखंडे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे, राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दामोदर दादा राजपूत, भुसावळ मनपा बचतगटाच्या समन्वयीका सौ.अलका शिरसाट आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©