Home Breaking News उद्यापासून साखरखेर्डा येथे खासदार चषकाचे आयोजन : सुमारे दोन लाख रुपयांच्या बक्षिसांची...

उद्यापासून साखरखेर्डा येथे खासदार चषकाचे आयोजन : सुमारे दोन लाख रुपयांच्या बक्षिसांची लैलूट

19
Oplus_131072

उद्यापासून साखरखेर्डा येथे खासदार चषकाचे आयोजन :
सुमारे दोन लाख रुपयांच्या बक्षिसांची लैलूट

🔸असलम अंजुम🔸

साखरखेर्डा : (दि.२३ जानेवारी) येथील क्रिकेट ग्राउंडवर आजपासून खासदार चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उदघाटन होणार असून उदघाटक म्हणून केंद्रीय आयुष्य मंत्री (स्वतंत्र प्रभार ) तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.प्रतापराव जाधव हे उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय गायकवाड, माजी आमदारद्वय डॉ. संजय रायमूलकर व डॉ.शशिकांत खेडेकर, जिल्हा प्रमुख प्रा.बळीभाऊ मापारी तसेच युवासेना जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव उपस्थित राहणार आहेत.
या क्रिकेट सामन्यांसाठी विविध जिल्ह्यांमधून एकूण ३२ संघ सहभागी होणार असून सामने लॉट्स आणि बाद पद्धतीने खेळविले जाणार आहेत. विशेष म्हणजे सर्व सामन्यांचे युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. विजेत्या संघाला योगेश भाऊ जाधव मित्रमंडळाच्या वतीने
आकर्षक खासदार चषकासह रोख ₹ १ लाख १ हजाराचे प्रथम पारितोषिक तर उपविजेत्या संघाला महेंद्र भाऊ पाटील मित्रमंडळाच्या वतीने ₹ ५१ हजाराचे द्वितीय बक्षिस देण्यात येणार आहे. तृतीय आणि चतुर्थ बक्षिसांसह मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आदी उत्तेजनार्थ बक्षिसेही आयोजन समिती व इतर मान्यवरांकडून देण्यात येणार आहे.
पंचक्रोशीतील समस्त क्रिकेट प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

Copyright ©