Home Breaking News चिखली- लव्हाळा रस्त्यावर रोडरॉबरीचा प्रयत्न फसला रस्ता अडवून गाड्यांवर दगडफेक, साखरखेर्डा पोलीसांनी...

चिखली- लव्हाळा रस्त्यावर रोडरॉबरीचा प्रयत्न फसला रस्ता अडवून गाड्यांवर दगडफेक, साखरखेर्डा पोलीसांनी रात्र भर तळ ठोकला

31

चिखली- लव्हाळा रस्त्यावर रोडरॉबरीचा प्रयत्न फसला रस्ता अडवून गाड्यांवर दगडफेक, साखरखेर्डा पोलीसांनी रात्र भर तळ ठोकला
साखरखेर्डा lप्रतिनिधी – चिखली मेहकर रोडवर लव्हाळा नजीक पाटोदा फाट्यावर काल दि 16 जानेवारी रोजी रात्री साडेदहाचे सुमारास हायवे  रस्त्यावर दगड टाकून चार चाकी गाड्या अडविण्यात येऊन काचा फोडल्याने जिल्ह्यात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार असे समजते की, दि 16 जानेवारी रोजी चिखली लव्हाळा रस्त्यावर रोडरॉबरीचा प्रयत्न करताना चोरांनी पाटोदा फाट्यावर मुख्य रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रवाशी निवाऱ्यातील बाकडे आडवे केले मात्र वाहन चालकांनी न थांबता गाडी पळविण्याचा प्रयत्न केला दरम्यान या रस्त्याने जाणाऱ्या दहा ते पंधरा वाहनावर प्रवाशी निवाऱ्या आडून तुफान दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या साखरखेर्डा येथील बाबुसेठ कुरेशी यांच्या गाडीचे टायर फुटले मात्र क्रुझर मधून आठ ते दहा जण असल्याचे पाहून चोरांचा रॉबरीचा प्रयत्न फसला. तथापि तातडीने ठाणेदार गजानन करेवाड यांना हि माहिती मिळताच ठाणेदार गजानन करेवाड, दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे, पो कॉ विनायक परिहार तेथे पोहोचले दरम्यान साखरखेर्डा, चिखली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम राबविली असता चोरटे मिळून आले नाही. दरम्यान ठाणेदार गजानन करेवाड यांनी रस्त्यावरील रोडरॉबरीचा प्रयत्न फसल्यामुळे आजूबाजूच्या गांवात चोरीचा प्रयत्न केला जाऊ शकतो म्हणून सभोवतालच्या गांवातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. दरम्यान पाटोदा रस्त्यावर असलेल्या सवडदचे ग्रामविकास अधिकारी गौतम गवई यांच्या कोंबड्या चोरीला गेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. ठाणेदार गजानन करेवाड यांनी रात्रभर तळ ठोकल्याने पुढील अनर्थ टळला आहे मात्र जिल्ह्यात वाहनाव्दारे प्रवास करणाऱ्या वाहनचालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या पारदर्शक कारभाराला चोरट्यांनी एक प्रकारे खुले आव्हान दिले आहे. दरम्यान वाहनधारकांनी रस्त्यावर रात्री गाडी थांबवू नये असे आवाहन ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले आहे.

Copyright ©