Home Breaking News संग्रामपूर तालुका शिक्षकेतर संघटनेची कार्यकारिणी जाहीर शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांच्या...

संग्रामपूर तालुका शिक्षकेतर संघटनेची कार्यकारिणी जाहीर शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न…

16

संग्रामपूर तालुका शिक्षकेतर संघटनेची कार्यकारिणी जाहीर

शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न…

🔸असलम अंजुम🔸

संग्रामपूर : (दि. १२ जानेवारी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळाशी (नोंदणी क्रमांक बी.वाय/टू/8281 दिनांक 20/11/1986) संलग्नित बुलढाणा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेची आढावा बैठक 11 जानेवारी रोजी बापूसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय निवाणा ता.संग्रामपूर येथे संपन्न झाली. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र महाजन, कोषाध्यक्ष मो. रिजवान , महिला जिल्हा उपाध्यक्ष ठाकरे मॅडम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संग्रामपूर तालुका शिक्षकेतर संघटनेची तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्षपदी रंगराव सुधाकरराव देशमुख (बापूसाहेब देशमुख कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, निवाना संग्रामपूर), तालुका सचिव – नसीरुद्दीन नाजेरोद्दिन काजी (जोहरा इस्माईल उर्दू हायस्कूल बावनबीर), तालुका सहसचिव – विजय शालिग्राम गाळकर , तालुका कोषाध्यक्ष – अमीर शाह, सेवक उपाध्यक्ष – सज्जाद हुसेन शफाकत हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस संग्रामपूर तालुक्यातील सर्वच शाळांचे शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. संघटना मजबूत करून अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मो. रिजवान यांनी तर सूत्रसंचालन नसीरुद्दीन नाजेरोद्दिन काजी यांनी केले.

Copyright ©