जळगाव जामोद तालुका शिक्षकेतर संघटनेची कार्यकारिणी जाहीर
शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न.
🔸असलम अंजुम🔸
जळगांव जामोद : (दि. १२ जानेवारी ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळाशी (नोंदणी क्रमांक बी.वाय/टू/8281 दिनांक 20/11/1986) संलग्नित बुलढाणा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेची आढावा बैठक 11 जानेवारी रोजी केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद येथे संपन्न झाली. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र महाजन, कोषाध्यक्ष मो. रिजवान , महिला जिल्हा उपाध्यक्ष ठाकरे मॅडम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत जळगाव जामोद तालुका शिक्षकेतर संघटनेची तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्ष पदी विश्वास रघुनाथ टाले (बी.एस. पटेल कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव काळे), तालुका सचिव – गजानन रामचंद्र खरात (सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव जामोद), तालुका उपाध्यक्ष – विजय बोंबटकार (सेठ तुळशिरामजी ढोकणे कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आसलगाव), तालुका कोषाध्यक्ष – मो. रेहान (अल्फरान उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेज जळगाव जामोद), सेवक उपाध्यक्ष – फिरोज खान यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला जळगाव जामोद तालुक्यातील सर्वच शाळांचे शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान नवनियुक्त तालुका कार्यकारणीतील सदस्यांचे नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. संघटना मजबूत करून अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मो. रिजवान यांनी तर सूत्रसंचालन गजानन खरात तसेच आभार प्रदर्शन शैलेंद्र महाजन यांनी केले.