शॉर्टसर्किटने खुराना ट्रॅव्हल्स जळून खाक सुदैवाने जीवित हानी टळली
समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 300.1 वरील घटना
🔸गुलशेर शेख🔸
दुसरबीड : (दिनांक 6 जानेवारी)
नागपूर वरून नाशिक कडे जाणारी एम एच 40 सीटी 80 43 खुराणा ट्रॅव्हल्स दिनांक पाच रात्री दोन वाजून 45 चायनेज क्रमांक 300 .1 वर रात्री दोन वाजून 45 मिनिटाला धावत्या ट्रॅव्हल्स मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची घटना घडली नागपूर वरून नाशिक कडे जाणाऱ्या या ट्रॅव्हल्स मध्ये एकूण 36 प्रवासी होते चालक शेख वाहिद शेख यांच्या तत्परतेने सर्वच प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले अपघात स्टडी महामार्ग पोलीस पोचून अग्निशामन दलाचे वाहन बोलवून आग विझवली प्रवासी सुखरूप दुसरबिड टोलनाक्यावर सरकारी गाडीने पोहोचले यावेळी महामार्ग पोलीस एपीआय इंगळे हेड कॉन्स्टेबल गायकवाड दुनगू राठोड सोबत एम एस एफ चे जवान अग्निशामक दलाचे जवान ॲम्बुलन्स चालक यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत आग विझवण्याचा प्रयत्न केला चालक वाहक यांनी वेळीच तत्परता दाखवल्याने समृद्धी महामार्गावर याच रोडवर झालेल्या त्या जुन्या अपघाताची पुनवृत्ती होता होता टळली