Home Breaking News जिजाऊ सृष्टीवर सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

जिजाऊ सृष्टीवर सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

26

जिजाऊ सृष्टीवर सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

🔸असलम अंजुम🔸

साखरखेर्डा : (५ जानेवारी) मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३ जानेवारीपासून ते १२ जानेवारी पर्यंत सावित्रीबाई फुले – माँसाहेब जिजाऊ दशरात्रोत्सव प्रारंभ झाला या दहा दिवसात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी सिंदखेडराजा नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिवश्री सौरभ तायडे त्यांच्या पत्नी शिवमती जयश्री तायडे, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, त्यांच्या पत्नी शिवमती रूपालीताई गारोळे, लोणारच्या नगराध्यक्ष शिवमती मीराताई भूषण मापारी व शिवश्री भूषण मापारी यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सवाच्या प्रचार आणि प्रसार रथाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सिंदखेडराजा नपाचे नगरसेवक व नगरसेविका श्रेया खरात, पोर्णिमा भुसारे, सिंधुताई ठाकरे, पूजाताई खुरपे, पुष्पा बारवकर, सोनाली मेहेत्रे, प्रेम कोरडे, दिलीप आढाव, गणेश चोरे, या मान्यवर नगरसेवकासह विचार मंचावर मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव डॉ.मनोहर तुपकर, इंजिनीयर रविकांत काळवाघे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चेके, जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, विलास तेजनकर, विश्वनाथ बाहेकर, सुखदेव बुरकुल, विनायक दंदाले, विष्णू म्हसागर, सागर खांडेभराड, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अँड उर्मिला हाडे, वारकरी परिषदेच्या ज्योतीताई जाधव, मुख्याधिकारी आशिष बोबडे,अँड राजेंद्र ठोसरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक योगेश पाटील, तालुकाध्यक्ष मधुकर गव्हाड या मान्यवरांची उपस्थिती होती.

द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान जिजाऊ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सावित्रीबाई फुले व माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अँड उर्मिला हाडे व रंजना देशमुख यांनी जिजाऊ वंदना घेतली. विचारपिठावर उपस्थित नगराध्यक्ष आणि नगरसेविका व सिंदखेड राजा परिसरातील सर्व पत्रकार बांधव या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवश्री राजेंद्र ठोसरे यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी आपल्या मनोगतामध्ये १९९० मध्ये स्थापन झालेले मराठा सेवा संघ सातत्याने जिजाऊ जन्मोत्सवास आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन जात असल्याचे सांगत मराठा सेवा संघास जिजाऊ जन्मोत्सवाच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारची मदत करण्याचे अभिवचन दिले यानंतर मुख्याधिकारी आशिष बोबडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी सावखेड तेजनच्या जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमात संजय धोरण, संजय विखे पाटील, रमेश ढगे, राजकुमार जाधव, ज्योतीताई खांडेभराड, सविता खांडेभराड, लता साबळे, व मातृतीर्थ सिंदखेडराजातील युवा, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष मधुकर गव्हाड यांनी मानले.

Copyright ©