Home Breaking News जनजागृती आणि समाजकार्यात वृत्तपत्रांचा मोठा वाटा : प्रा.संजय खडसे सिंदखेड राजा येथे...

जनजागृती आणि समाजकार्यात वृत्तपत्रांचा मोठा वाटा : प्रा.संजय खडसे सिंदखेड राजा येथे पत्रकार दिन सोत्साह साजरा

17

जनजागृती आणि समाजकार्यात वृत्तपत्रांचा मोठा वाटा : प्रा.संजय खडसे

सिंदखेड राजा येथे पत्रकार दिन सोत्साह साजरा

🔸असलम अंजुम🔸

साखरखेर्डा :  जनजागृती आणि समाजकार्यात वृत्तपत्रांचा मोठा वाटा असून प्रशासनाला गतिमान करण्याचे काम पत्रकार बांधव करीत असतात. असे प्रतिपादन उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले. ते दि. ६ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलत होते.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून तालुका प्रशासन आणि पोलीस विभागाच्या वतीने सिंदखेड राजा पोलीस स्टेशनच्या आवारात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील बहुतांश सर्वच पत्रकारांचा यावेळी शाल – पुष्पगुछ आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार अजित दिवटे, गट विकास अधिकारी अजितकुमार बांगर, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, सिं.राजा नप मुख्याधिकारी आशिष बोबडे, ठाणेदार आशिष इंगळे, किनगावराजा चे ठाणेदार संजय मातोंडकर, साखरखेर्डा ठाणेदार गजानन करेवाड, तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, ना. तहसीलदार अजित नितीन बडे, महिला व बालकल्याण विभागाचे गणेश डोभाल आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस हरार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार इंगळे, गटविकास अधिकारी अजित बांगर, प्रा.नाईकवाड, पत्रकार मुकुंद पाठक, लोकजागर परिवारचे विश्वस्त प्रवीण गीते यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन रोहित म्हस्के तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रावण डोंगरे, बालाजी सानप, दीपक जयभाये, इरफान सय्यद, शंकर तांबेकर, विकास राऊत, जाकेर खान सलीम परसुवाले, संजय डोंगरदिवे, विठ्ठल आंधळे, जगदीश सानप आदींनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©