Home Breaking News सासरवाशीनीला मिळाली माहेरची भेट पहिले भाग्यवान खंडारे यांना “माहेर” कडून लेकीसाठी स्कुटीची...

सासरवाशीनीला मिळाली माहेरची भेट पहिले भाग्यवान खंडारे यांना “माहेर” कडून लेकीसाठी स्कुटीची भेट

41
  • सासरवाशीनीला मिळाली माहेरची भेट

    पहिले भाग्यवान खंडारे यांना “माहेर” कडून लेकीसाठी स्कुटीची भेट

    साखरखेर्डा lप्रतिनिधी – गत पस्तीस वर्षापासून ग्राहकांच्या मनात आपली विश्वासार्हता जपणारे विकास इंगळे यांनी माहेर ज्वेलर्सच्या माध्यमातून दिपावली दरम्यान एक ग्रॅमचे वर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी धमाका अॉफर सुरू केली होती.

       या वेळी साडेचारशे ग्राहकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. नवीन वर्षाच्या पाश्र्वभूमीवर शिवाजी व्यायाम शाळेच्या प्रांगणात ठाणेदार गजानन करेवाड,माजी सरपंच महेंद्र पाटील, ग्रामसेवा सहकरी संस्थेचे अध्यक्ष ललितकुमार अग्रवाल, दिलीपकुमार लखोटीया यांच्या उपस्थितीत ही सोडत झाली. दरम्यान एका बालकाच्या हाताने पहिल्या भाग्यवंतासाठी स्कुटीची सोडत काढण्यात आली. यामध्ये पहिले भाग्यवंत दिलीप नारायण खंडारे हे ठरले तर दुसरे बक्षिस एलसीडी टि व्ही चे भाग्यवान सिंध्दू सुधाकर इंगळे, तर तिसरे बक्षिस मोबाईल फोनचे भाग्यवान शेख अन्वर शे हुसेन हे ठरले.

         विशेष उल्लेखनीय म्हणजे यातील पहिले भाग्यवंत दिलीप खंडारे यांनी आपल्या लेकीला दिपावलीत स्कुटी भेट देण्याचा वादा केला होता. यावेळी माहेर ज्वेलर्सच्या माध्यमातून खंडारे यांच्या लेकिला नववर्षाच्या पर्वावर ही माहेरची भेट अनोखी ठरली.

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार संतोष गाडेकर यांनी केले. यावेळी बालनाथ कासार, अशोक इंगळे, गोपाल मानतकर, निलेश पोंधे, नितीन सोनोने, युवा उद्योजक आदित्य पाटील, सत्यजित इंगळे, अभिजित इंगळे उपस्थित होते. यावेळी माहेर ज्वेलर्सचे संचालक विकास इंगळे यांनी भविष्यात महिलांसाठी आकर्षक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.

Copyright ©