ना प्रतापराव जाधव यांच्या गाडीला अपघात, चालकासह सुरक्षा रक्षक जखमी
साखरखेर्डा lप्रतिनिधी – केंद्रीय आयुष मंत्री ना प्रतापराव जाधव यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना काल दि 28 डिसेंबरचे रात्री साडेनऊ वाजता घडली. दरम्यान चालकासह सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार असे समजते की, दि 28 डिसेंबरचे सकाळी ना प्रतापराव जाधव यांना नागपूर येथे विमानतळावर सोडून चालक भुषण चोपडे व सुरक्षा रक्षक पो कॉ वैभव देशमुख हे इंडिवर क्र एम एच 28-बी के 0077 ने मेहकर येथे येत असताना मालेगाव टोलनाक्यावर समोरून येणाऱ्या पिकअपचे टायर फुटल्याने समोरून येऊन धडकली दरम्यान चालक भुषण चोपडे आणि सुरक्षा रक्षक वैभव देशमुख दोघे किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान घटनास्थळी मालेगाव पोलीसांनी मदत केली.