Home Breaking News महाराष्ट्रातील सर्वांत कमी वयाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा जिजाऊ सृष्टीवर सत्कार

महाराष्ट्रातील सर्वांत कमी वयाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा जिजाऊ सृष्टीवर सत्कार

26


महाराष्ट्रातील सर्वांत कमी वयाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा जिजाऊ सृष्टीवर सत्कार

असलम अंजुम

साखरखेर्डा : (दि. २८ डिसेंबर) नुकत्याच महाराष्ट्रातील सर्वांत कमी वयाचे नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

  1. केंद्रीय आयोजन समितीच्या वतीने जिजाऊ सृष्टीवर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे, जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहेकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा, मराठा सेवा संघाचे कॅलेंडर आणि पुस्तक भेट देण्यात आली. यावेळी प्रा.शिवाजी तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ सृष्टीचे सहसचिव सौरभ खेडेकर, प्रकल्प संचालक अरविंद गावंडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चेके, मुख्य समन्वयक डॉ.मनोहर तुपकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई हाडे, वारकरी परिषदेच्या ज्योतीताई जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील, तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थितांनी आपल्या मनोगतात नगराध्यक्ष सौरभ तायडे हे महाराष्ट्रातून सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याने त्यांचे विशेष कौतुक करत

    राष्ट्रमाता जिजाऊंच्या पावन भूमीत नागरिकांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली असल्याचे सांगत दि. १२ जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवादरम्यान जिजाऊ भक्तांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी घेत प्रशासनाच्या वतीने विशेष उपाययोजना करण्याची विनंती केली.

    याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे म्हणाले की, जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक उत्सव असून या नगरीचं वैभव आहे. माझ्या कालखंडामध्ये मातृतीर्थ सिंदखेडराजाचा विकास कसा होईल याकडेच माझा भर असणार असून जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात मराठा सेवा संघाच्या संयोजन समिती सोबत समन्वय ठेवूण नगराचा नगराध्यक्ष म्हणून मी कमी पडणार नाही असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विलास तेजनकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©