Home Breaking News जिजाऊ जन्मोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे : केंद्रीय आयोजन समितीच्या बैठकीत विजयकुमार घोगरे...

जिजाऊ जन्मोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे : केंद्रीय आयोजन समितीच्या बैठकीत विजयकुमार घोगरे यांचे प्रतिपादन

41

जिजाऊ जन्मोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे :
केंद्रीय आयोजन समितीच्या बैठकीत विजयकुमार घोगरे यांचे प्रतिपादन

असलम अंजुम

साखरखेर्डा : (दि. २८ डिसेंबर) आगामी १२ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे होऊ घातलेल्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव हा लोकोत्सव करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहेकरे,ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.शिवाजीराव तनपुरे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ सृष्टी सहसचिव सौरभ खेडेकर, प्रकल्प संचालक अरविंद गावंडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र चेके, मुख्य समन्वयक डॉ. मनोहर तुपकर, डॉ कळकुंबे पाटील, विलासराव तेजनकर, तुपकर मामा, रामेश्वर ढगे पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अँड उर्मिला हाडे, वारकरी परिषदेच्या ज्योती ताई जाधव, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक योगेश पाटील, सुदर्शन तारक, जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील,अमर पाटील, संजय धोरण, संजय विखे, विवेक काळे, प्रा.गव्हाड, आरमाळ सर, सागर खांडेभराड, रंजना देशमुख, ज्योती खांडेभराड, सविता खांडेभराड, आकांक्षा देशमुख, लता साबळे,नंदा आरमाळ, प्रिया हराळे, शारदा बावणे, दिपाली पडोळे, अकोला येथील पटोकार राजकुमार जाधव, विजय वाडेकर, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष विजय देशमुख, प्रा.दिलीप
नाईकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी जिजाऊ माँसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हरार्पण करुन अभिवादन करण्यात आले तदनंतर जिजाऊ स्तवन झाले व नंतर मुख्य बैठकीत जिजाऊ जन्मोत्सवाच्या आयोजनातील महत्त्वाचा प्रश्नावर चर्चा करण्यात आली, ज्यात जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,स्थानिक पोलीस स्टेशन,नगरपालिका यांच्याशी समन्वय साधून जिजाऊ जन्मस्थळ ते जिजाऊ सृष्टीपर्यंतच्या अंतरामध्ये,एस.टी महामंडळातर्फे अल्प दरात तिकीट लावून सकाळपासून संध्याकाळपर्यंत बस सेवा सुरू ठेवण्यात यावी त्यामुळे लहान मुले, महिला,पुरुष,तसेच इतरही जिजाऊ भक्तांना सर्व कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. त्यामुळे जिजाऊ सृष्टी ते जिजाऊ जन्मस्थळ या ठिकाणच्या सर्व पार्किंग व्यवस्थेत सुसूत्रता, समन्वय असावा तसेच वाहनांना न अडवता व वाहतूक व्यवस्था सुरक्षितपणे चालवून जालना रोड वरील पार्किंग पर्यंत जिजाऊ भक्तांना सहज येता आली पाहिजे. तसेच एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध होत नसल्यास स्थानिक शाळांच्या बसव्यवस्था विषयी सहकार्य घेण्यात यावे याविषयी सर्वांचे एकमत झाले. यावेळी सिंदखेड राजा नगरीचे नवनिर्वाचित तरुण नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना त्यांनीसुद्धा जन्मोत्सव सोहळ्यास नगरपालिकेच्या वतीने सर्वोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
बैठकीत सर्व सुविधांसाठी येणारा खर्च,जमा होणाऱ्या निधीचे नियोजन व पारदर्शकता यावरही चर्चा झाली. जिजाऊ जन्मोत्सव प्रचार आणि प्रसार तसेच समाज माध्यमांचा व्यवस्थित उपयोग करून आयोजना पासून ते जन्मोत्सवापर्यंतची माहिती महाराष्ट्रभर प्रसारित करण्यात यावी.
याप्रसंगी विविध समित्यांचे गठण करण्यात आले.
त्यात बुक स्टॉल व बुकिंग वाटप : सुमित खांदवे, प्रा.अशोक निकस,शाहीर व पोवाडे समिती शाहीर गुलाबराव नळणीकर, शाहीर सतीश कुरंगळ, नवोदित वक्ते व सांस्कृतिक समिती रवींद्र चेके, विनायक दंदाले, मदन बोडखे, सामूहिक विवाह समिती विलास तेजनकर, अशोक मामा तुपकर, गजानन चेके, साहित्यप्रकार समिती डॉ बालाजी जाधव,प्रा. गजानन जारे, प्रा.दीपक पाचरणे, प्रमुख अतिथी निमंत्रण समितीमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पाहुणे यांना आमंत्रित करणे, ही जबाबदारी प्रशांत तेलगड, प्रा.योगेश्वर निकस, महिला निवास समिती अँड उर्मिलाताई हाडे, लताताई शिंदे, रंजनाताई देशमुख, सविताताई खांडेभराड, पुरुष निवास समिती डॉ खांदवे, डॉ कळकुंबे, रामेश्वर कुहिरे, एकनाथ मस्के, बाहेर जाऊन येणाऱ्यांची निवास व्यवस्था वृंदावन लॉन विलास तेजनकर, अतुल शिंदे, जगदीश एखंडे, संदीप सास्ते, संदीप कानोडजे, दुसरबीड येथे प्रा.सुधीर निकम,अशोक सावडेसर, जालना निवास व्यवस्था बाबासाहेब कडोस, बबन गाडेकर, देऊळगाव राजा एकनाथ जाधव, वसंत शिंदे, दीपोत्सव मशाल व यात्रा उर्मिला ताई हाडे, ज्योतीताई जाधव,शारदा बावने, प्रा.प्रियाताई हराळे, राहुल कुहिरे,श्रीहरी कुहिरे,
दि. ११ जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रम समिती जिजाऊ ब्रिगेड राज्य कार्यकारिणी सीमाताई बोके, दि. १२ जानेवारी वारकरी दिंडी सोहळा शिवमती ज्योतीताई जाधव, पंडितराव देशमुख, व्हीआयपी निवास व्यवस्था समिती अण्णासाहेब आरमाळ, रामेश्वर ढगे,लक्ष्मण लोंढे, दिलीप मानवतकर, अँड निशिकांत राजे, सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव समिती उर्मिलाताई हाडे, नंदाताई आरमाळ, प्रा.गव्हाड, सुखदेव बुरकुल, सागर खांडेभराड, संत चोखामेळा जयंती समिती, सुखदेव बुरकुल, संजय राजे, संतोष बुरकुल, प्रचार प्रसारक रथ सिं.राजा प्रा.मधुकर गव्हाड, दे.राजा अमोल दंदाले, सुरक्षा समिती योगेश पाटील, गजानन भोयर, पांडुरंग पाटील,अमर पाटील , विचार मंच संयोजन समिती प्रा.मधुकर गव्हाड, धनंजय पाटील, रवींद्र चेके, योगेश पाटील,अँड राजेंद्र ठोसरे, विचारमंच सजावट समिती माधव शिरफुले, संजय विखे, कैलास तायडे, प्रचार प्रसार, समाज माध्यम समिती प्रा.दिलीप नाईकवाड, विनीत वानखेडे, अभय पाटील, विवेक काळे, रणजीत थिपे, हर्षवर्धन कदम अशाप्रकारे विविध समित्यांची जबाबदारी याप्रसंगी देण्यात आली असून जिजाऊ माँ साहेबांचा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी केंद्रीय समिती व संयोजन समितीने संयुकतरित्या करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Copyright ©