गावंडे महाविद्यालयात गणित दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
साखरखेर्डा : (प्रतिनिधी ) स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय गणित दिन प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. गणेश काकडे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथपाल डॉ प्रकाश कोल्हे, रसायनशात्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत महल्ले, व डॉ सागर गवई उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्रा. गणेश काकडे यांनी मानवाने जी तंत्रज्ञानात जबरदस्त प्रगती केली आहे, ज्यायोगे आपले जीवन कमालीचे सुखासीन बनले आहे, त्याच्या पायाशी गणितच आहे. गणिताशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट गणित आहे. आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट एक संख्या आहे. आपला सभोवताल गणिताने व्यापलेला असून मानवी जीवनात गणिताचे अनन्यसाधारण महत्व आहे. आयुष्य सोपे-सुरळीत करते, ते गणित असे मत व्यक्त केले. याप्रसंगी गणितज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत खोद्रे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ निलेश ताले यांनी केले तर आभार डॉ. चौरपागार यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, गणित विभागाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. गणित दिनाचे औचित्य साधून विभागामार्फत राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धा व प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.