Home Breaking News सुमित ज्ञानेश्वर गवई यांना “महाराष्ट्र समाज रत्न’ राज्यस्तरीय 2025 पुरस्कार प्रदान

सुमित ज्ञानेश्वर गवई यांना “महाराष्ट्र समाज रत्न’ राज्यस्तरीय 2025 पुरस्कार प्रदान

38

सुमित ज्ञानेश्वर गवई यांना “महाराष्ट्र समाज रत्न’ राज्यस्तरीय 2025 पुरस्कार प्रदान

साखरखेर्डा : (प्रतिनिधी) येथील सुमित ज्ञानेश्वर गवई यांना 2025 चा “महाराष्ट्र समाज रत्न” राज्यस्तरीय पुरस्कार आज दिनांक 21 डिसेंबर रोजी साई पार्क सोसायटी आळंदी देवाची पुणे येथे मदनजी सिताराम रेनगडे पाटील (अध्यक्ष शिवप्रतिष्ठान पुणे ) तसेच श्री अच्युतराव सिताराम पाथरकर (उपाध्यक्ष शिवप्रतिष्ठान पुणे) आणि तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सुमित गवई यांच्या सामाजिक, प्रशासकीय कार्याची दखल घेत शिवप्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग, कला, कृषी, प्रशासन, पर्यावरण, यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामांकित व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. सुमित ज्ञानेश्वर गवई यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©