पोलीस पाटलांनी राजकीय विरहित पारदर्शक काम करावे -पोलीस अधीक्षक निलेश तांबे साखरखेर्डा lप्रतिनिधी – शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणुन “पाटील” हे पद अस्तित्वात होते , प्राचीन काळापासुन गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखाची महत्त्वाची भूमिका असायची त्या भुमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायची. महाराष्ट्रात या पदावर सहसा कर्तृत्त्ववान, शुर व धाडसी व्यक्तीच असायची, गावगाडा चालवत असताना न्यायपूर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील हे इतिहासात नावारूपास येऊन अजरामर झाले आहेत. आजची ग्रामीण भागात पोलीस पाटलांचे नमस्कार महत्त्व आबाधित असून पोलीस पाटलांनी राजकारण विरहित काम करून पोलीसांना सहकार्य करावे असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी व्यक्त केले. ते दि १९ डिसेंबर रोजी ते साखरखेर्डा पोलीस ठाण्यात वार्षिक निरिक्षणासासाठी आले असता साखरखेर्डा पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार गजानन करेवाड उपस्थित होते. प्रारंभी साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात ठाणेदार गजानन करेवाड यांनी पोलीस पाटलांकडून पोलीसांना असलेले उचित सहकार्य आणि पोलीसांना असलेल्या अपेक्षा यासंदर्भात मार्गदर्शन केले. पुढे तांबे आपल्या भाषणात म्हणाले की, पूर्वी ग्रामीण भागात जाण्यासाठी पोलिसांना वेळ लागत होता रस्ते अडगळीचे होते. दळणवळणाची कोणतीच साधने नव्हती अशा वेळी लोकांना सोयीचे व्हावे यासाठी गावागावात पोलीस पाटील पद गावात निर्माण करण्यात 17 डिसेंबर 1967 महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा कायदा संमत करण्यात आला व त्यानुसार स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आले. त्यांचा उपयोग गावपातळीवर महसूल व पोलीस प्रशासनाला नियमित होत गेला. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अधिनियम 86 नुसार पोलीस पाटील गाव पातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये कार्य करत असतात. पोलीस पाटलांना मोठे अधिकार असून आपण याचा वापर करून गावातील घटना, घडामोडींचा लेखाजोखा पोलीसांपुढे मांडला पाहिजे पोलीस पाटलांनी दीर्घ काळ काम करावे म्हणून शासनाने वेतनात देखील वाढ केली आहे. असे सांगून वेळेवर वेतन मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान त्यांनी पोलीस ठाण्याच्या पारदर्शक कारभाराची मुक्तकंठाने प्रशंसा करून पोलीसांच्या समस्या ऐकून घेतल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले.