Home Breaking News तुरीच्या शेतात गांजाची लागवड, करणाऱ्या शेतकऱ्यांला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

तुरीच्या शेतात गांजाची लागवड, करणाऱ्या शेतकऱ्यांला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

45
तुरीच्या शेतात गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

   साखरखेर्डा lप्रतिनिधी – येथील पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजे मलकापूर पांग्रा शिवारात एका तुरीच्या शेतात साखरखेर्डा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मादक पदार्थ गांजाचे ओलसर झाडे वजन 76. किलो 06 ग्राम  किमत 11,40,900/-रु  व गांजाचे सुकलेले झाडे वजन 05किलो 560 ग्रॅम किंमत  1,11,200/ रु असा एकूण 81.62 किलोग्रॅम किंमत एकूण 1252100/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली होती. दरम्यान सदर आरोपी शेतकऱ्यांला साखरखेर्डा पोलीसांनी सिंदखेडराजा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
<span;>     प्राप्त माहितीनुसार असे समजते की, गेल्या अनेक दिवसांपासून मलकापूर पांग्रा येथे गट क्र ५०६ मध्ये तुरीच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली दरम्यान दि १८ डिसेंबरचे दुपारी सहायक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पो हे कॉ दिगंबर कपाटे, गजानन दराडे, वनीता शिंगणे, विजय वारूळे, दीपक वायाळ,
<span;>मंगेश सनगाळे, मनोज खर्डे, समाधान टेकाळे यांनी छापा टाकून महसूल कर्मचारी यांचे समक्ष पंचनामा करून सुधाकर संपतराव गायकवाड वय 65 राहणार मलकापूर पांग्रा यांच्या तुरीच्या शेतातील गांजाचे ओलसर झाडे वजन 76. किलो 06 ग्राम  किमत 11,40,900/-रु  व गांजाचे सुकलेले झाडे वजन 05किलो 560 ग्रॅम किंमत  1,11,200/ रु असा एकूण 81.62 किलोग्रॅम किंमत एकूण 1252100/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आदेशानुसार सहा पोलीस निरीक्षक यशोधा कणसे यांनी धडक मोहीम उघडली असून गेल्या दोन दिवसांपूर्वी मेव्हणाराजातही अशीच कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे हे करीत आहेत. 




Copyright ©