विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय सदस्यपदी सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांची निवड
सिंदखेडराजा lप्रतिनिधी – येथील श्रीमज्जगदगुरु पलसिध्द महास्वामी पिठाचे मठाधिपती सिध्दचैतन्य यांची नुकतीच विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच दिल्ली येथे बाबा नथ्थ्थसिंग वाटिकेत पार पडलेल्या केंद्रीय बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीला श्री चंपतराय उपाध्यक्ष-विश्व हिंदू परिषद सरचिटणीस श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र, अशोक तिवारी
केंद्रीय मंत्री विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय धर्माचार्य संपर्क प्रमुख, धनंजय महाराज वासोडे, विहिपचे केंद्रीय मार्गदर्शक सुदाशू महाराज, प्राची देवी,विहिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अलोकनाथ, यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे. यामध्ये लव्ह जिहाद, शालेय – मुला मुलींना जडणारे ड्रग्जचे व्यासन, अन्न वस्त्र निवाराचे आमिष दाखवून जबरदस्तीने करण्यात येणारे धर्मांतर आदी संदर्भात संतांनी आपल्या प्रवचनातून, घरोघरी धर्मप्रसारातून जनजागृती करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी देशातील विविध प्रांतांतील धर्मगुरू उपस्थित होते.




