फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा लावला सहामहिन्यानंतर छडा
दुय्यम ठाणेदारांच्या दिरंगाईमुळे युवतीच्या पोटात चार महिण्याचा गर्भ🔺प्रतिनिधी🔺
साखरखेर्डा -येथून थोड्याच अंतरावर असलेल्या मौजे शेंदुर्जन येथील वसंतराव नाईक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यानीला सहामहिण्यापूर्वी फूस लावून पळवून नेल्यानंतर सदर युवतीला शोधून काढण्यास साखरखेर्डा पोलीसांना यश आले आहे.
प्राप्त माहितीनुसार असे समजते की, शेंदूर्जन येथील सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गणेश विठ्ठल वडूळे रा शेंदुर्जन याने दि २३ जून ०२५ रोजी घरीकुणी नसल्याचे पाहून सदर युवतीस पळवून नेले. तथापि वडिलांनी साखरखेर्डा पोलीसात दि २५ जून रोजी तक्रार दाखल केली. दरम्यान दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांचेकडे तपास देण्यात आला. त्याचे काही दिवसानंतर मुलीच्या शेतमजूर वडिलाने दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांना वारंवार मुलीचा शोध घेण्यासाठी विनवणी केली. मात्र सानप यांनी काही प्रतिसाद दिला नाही. दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप याप्रकरणी काहीच तपास करीत नसल्याचे पाहून ठाणेदार गजानन करेवाड यांनी संलग्न पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांच्याकडे हा तपास सुपूर्द केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे, पोलीस हेडकॉस्टेबल रामदास वैराळ असे पथक पुणे येथील रांजणगाव येथे दि. १२ डिसेंबर रोजी रवाना झाले. तेथे दिवसभर शोध घेतला असता मध्यरात्री रांजणगाव करडे रोडलगत एका वस्तीत ह्या जोडप्याला सीनेस्टाईल ताब्यात घेण्यात आले. सहा महिण्यापासून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा एकाच दिवसात छडा लावल्या बद्दल ठाणेदार करेवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांचे कौतुक होत आहे. दरम्यान पिडीत युवतीला पोलीसांनी आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून आरोपीस गजाआड केले आहे.
*दुय्यम ठाणेदारांची दिरंगाई, मुलगी प्रेग्नंट!*
तपास अधिकारी दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांना माझी मुलगी शोधण्यासाठी वारंवार विनवणी केली मात्र त्यांनी हलगर्जीपणा केला. माझी मुलगी नेमकी कोठे आहे याची माहिती दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांना दिली होती त्यांनी दिरंगाई केली नसती तर मुलगी वेळीच ताब्यात मिळाली असती त्यांच्या दिरंगाईनेच माझ्या मुलीच्या पोटात चार महिण्याचा गर्भ आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी पिडित मुलीच्या पित्याने केली आहे.





