Home Breaking News जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक नागरे यांची बिनविरोध निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक नागरे यांची बिनविरोध निवड

25

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक नागरे यांची बिनविरोध निवड



सिंदखेडराजा lप्रतिनिधी – मातृतीर्थ सिंदखेड राजा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक नागरे  यांची तर उपाध्यक्षपदी बाळ पऱ्हाड, सचिवपदी रमेश पुंजाजी जैवळ आणि खजिनदारपदी सुभाष सखाराम गवई यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. निवडणूक निर्णय अधिकारी बी. जी. शेळके यांनी ही घोषणा करताच पतसंस्थेच्या कार्यालया परिसरात आनंदाचे वातावरण पसरले.
आज दिनांक १२ डिसेंबर रोजी सहायक संस्था निबंधक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या चारही पदांसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले.
शिक्षकांच्या आर्थिक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या या पतसंस्थेवर शिक्षक बांधवांचा असलेला विश्वास पुन्हा अधोरेखित झाला.
या प्रसंगी माजी अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे यांच्यासह संचालक कु. वर्षा ईघारे/जायभाये, लिंबाजी तायडे, तसलीम अली मुश्ताक अली, भानुदास लव्हाळे, गंगाधर खरात, सुभाष पवार, गैबीनंदन घुगे, शरद भोकरे, शरद नागरे, श्रीमती योगिता राठोड, अशोक सवडे, अशोक उगलमूगले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अविनाश नागरे, दत्ता सुरूषे, विलासराव आघाव, श्रीधर जायभाये, माणिकराव घुगे, दिलीप नागरे, शिवशंकर डोईफोडे, अशोक कांगणे, भानुदास दराडे, शिवाजी डिघोळे, नागेश खरात, अरुण खेडेकर, संजय ठाकरे, रामेश्वर सोनुने आदींची उपस्थिती लक्षणीय होती. सहायक संस्था निबंधक कार्यालयातील एम. पी. धुळे व पी. पी. पवार यांनी कामकाज पाहिले. तर पतसंस्थेचे व्यवस्थापक संतोष देशमुख उपस्थित होते.


शिक्षकांसाठीची आर्थिक वहिनी अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न” — नवनियुक्त अध्यक्ष अशोक नागरे
निवडीनंतर भावनिक स्वरात आपले मनोगत व्यक्त करताना अशोक नागरे सर म्हणाले :

“मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील शिक्षकांची आर्थिक वहिनी म्हणून पतसंस्थेने गेल्या अनेक दशकांत आपले स्थान निर्माण केले आहे. या पवित्र विश्वासाची मी कदर ठेवतो. सर्व शिक्षकांच्या हितासाठी पारदर्शक, संवेदनशील व शैक्षणिक भान राखून पतसंस्थेची वाटचाल अधिक जोमाने पुढे नेणार आहे. शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ आहेत आणि त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी ही पतसंस्था नेहमी तत्पर राहील.”
ही बिनविरोध निवड शिक्षक बांधवांच्या एकजुटीचे आणि पतसंस्थेवरील दृढ विश्वासाचे प्रतीक ठरली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांकडून संस्थेच्या शैक्षणिक आणि आर्थिक कार्यसंस्कृतीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Copyright ©