साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाची जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतला आढावा, दीड महिन्यात कार्यान्वित होणार
साखरखेर्डा । प्रतिनिधी- तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या साखरखेर्डा येथे माजी आ. डॉ शशिकांत खेडेकर यांच्या माध्यमातून ना एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री असताना मंजुर झालेल्या १४.९५ कोटी किंमतीचे ग्रामीण रुग्णालय पूर्णत्वास गेले आहे मात्र नवीन इमारत पूर्णतः उभी असूनही मनुष्यबळ आणि अग्निशमन प्रणाली कार्यान्वित नसल्यामुळे आजतागायत रुग्णालयाचे उदघाटन होऊनही अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध झाली नाही म्हणून सदर ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करण्याची मागणी ना. एकनाथ शिंदे यांच्या कडे डॉ. भाग्यश्री खेडेकर यांनी मागणी केली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याची दखल घेत प्रशासकीय कारवाई सुरू केली आहे.
ना शिंदे प्रचारासाठी सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये आले असता डॉ भाग्यश्री खेडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयासाठी डॉक्टर्स व इतर मनुष्यबळ निर्मितीसाठीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. याशिवाय तात्पुरती व्यवस्था जरी झाली तरी सदहू ग्रामीण रुग्णालय सुरु होऊ शकते. यामुळे महिला व माता-बाल आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झालेल्या अडचणी बरोबरच गर्भवती महिलांना प्रसुतीपूर्व तपासणी, सोनोग्राफी व प्रसुतीची सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातील रुग्णांना कोसोदूर जावे लागत आहे.
<span;>रात्री-अपरात्री तर हवी तशी दळणवळणाची साधने नसल्याने खडतर रस्त्यांमुळे रुग्णांना अक्षरशः मृत्यूचा सामना करावा लागत आहे.
<span;>नवजात बालकांच्या उपचारांची सुविधा नसल्यामुळे लहान बाळांचे जीव धोक्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना खासगी रुग्णालयाचा खर्च पेलणे अवघड असल्याने उपचार उशिरा घेतले जातात व गुंतागुंत वाढते.
<span;>या परिसरात रस्ते अपघात, शेतीतील यंत्रचालक अपघात, घरगुती किंवा सर्पदंशासारख्या घटना वारंवार घडतात. परंतु रुग्णालय सुरु नसल्याने जखमी महिलाना, मुलांना व नागरिकांना
<span;>उपचारासाठी तासन् तास बाहेर नेण्याची वेळ येते. त्यामुळे सदर ग्रामीण रुग्णालय त्वरित कार्यान्वित होण्यासाठी स्त्रीरोग व प्रसुती विभाग सुरू करणे, बालरोगतज्ज्ञ, प्रसूतितज्ञ, महिला नर्सिंग स्टाफ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आवश्यक वैद्यकीय कर्मचारी तातडीने नियुक्त करणे, अग्निशमन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून सुरक्षा मानकांची पूर्ततः रक्त तपासणी, सोनोग्राफी, नवजात बालक युनिट, औषध वितरण विभाग, प्रसूती कक्ष,रुग्णवाहिका सुविधा, रक्तदाब-शुगर तपासणी, व्यवस्था व २४ तास आपत्कालीन सेवा सुरू करणे, आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली होती तथापि अग्निशमन यंत्रणा साठी १३ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून एक महिण्यात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती मंगेश पागोरे यांनी दिली. यावेळी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्तात्रय बिराजदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, यांनी रुग्णालयाची पाहणी करून पलसिध्द कस्ट्रक्शनचे संचालक अर्जूनराव काटे यांचेकडून माहिती जाणून घेतली. दरम्यान लवकरच नोकरभरती उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी बिराजदार यांना दिले.
यावेळी किनगावराजा ठाणेदार संजय मातोंडकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाबुराव मोरे, गोपाल राजपूत, चरण राजपूत, बबलू जाधव, संतोष राजपूत संदीप मगर, संदीप खिल्लारे, सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




