Home Breaking News दुसरबीड रेती घाटामुळे परिसराचा वाळवंट होणार रद्द न केल्यास आमरण उपोषण

दुसरबीड रेती घाटामुळे परिसराचा वाळवंट होणार रद्द न केल्यास आमरण उपोषण

42

दुसरबीड रेती घाटामुळे परिसराचा वाळवंट होणार रद्द न केल्यास आमरण उपोषण

बुलढाणा lप्रा दिलीप नाईकवाड
🔶🔷🔶



जिल्ह्यातील खडकपूर्णा नदीवरील दुसरबीड येथील हराशी झालेला रेती घाट रद्द करण्या बाबत सिंदखेड राजा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना राहेरी येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं असून रेतीघाट रद्द न केल्यास लोकशाही मार्गाने न्यायाकरता आमरण उपोषण करावे लागेल असा इशाराही देण्यात आला असून यासाठी प्रशासन जबाबदार असेल असेही म्हटलेले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दुसरबीड येथील खडकपूर्णा नदीवरील रेतीघाटाची १५ नोव्हेंबरला हराशी झालेली असून घाटास लागून मौजे राहेरी बु. शिवारातील गट क्रमांक २०९ ते २९७ मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहे.शिवाय सदर गटाला लागूनच खडकपूर्णा नदीवर मेहकर जालना रोडवरील मोठा पूल असून रेती उत्खननामुळे या पुलास धोका निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता आहे निवेदनात असे म्हटले आहे की सद्यस्थितीत पुलाची अतिशय बिकट अवस्था असून रेती उत्खननामुळे अपघात झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हे प्रशासनावर दाखल करण्यात येतील राहेरी येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्हा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गटाला लागून कोल्हापूरी बंधारा झालेला असून त्यातून आम्ही आमच्या शेतजमिनी सिंचित करतो तसेच हराशी झालेल्या रेती घाटात राहेरी, दुसरबीड, पांगरी उगले, ताडशिवनी, किनगाव राजा, स्वयंदेव व इतर गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या विहिरी आहेत, या ठिकाणचा रेती उपसा झाल्यास, या संपूर्ण पिण्याच्या पाणीपुरवठा योजना शोभेच्या वस्तू ठरणार एकीकडे योजनांवरचा करोडो रुपये खर्च वाया जाणार असून वरील गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, कारण रेती मध्ये झालेला पाण्याचा संचय कोल्हापूर बंधाऱ्यातील पाणी संपल्यानंतर सुद्धा दोन महिने रेतीतील पाण्यातून पिण्याच्या पाण्याच्या योजना वरील सर्व गावांना पाणीपुरवठा करतात, शिवाय  रेतीतील पाणी संचयामुळे बंधाऱ्यातील पाणी संपल्यानंतर सुद्धा पिकांना किमान दोनदा पाणी सिंचन करता येते व त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी आपली उपजीविका करतात सदर ठिकाणचा रेतीउपसा झाल्यास दुसरबीड राहेरी शिवारातील शेत जमिनी, संपूर्ण पाणीपुरवठा व पिण्याच्या पाण्याच्या योजना उध्वस्त होणार असून शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी व मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे शेवटी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही याचे कारण पुलाच्या अलीकडच्या भागात रेती घाट हराशी झालेला होता त्या ठिकाणची खडकाला लागेपर्यंत संपूर्ण रेती रेतीमाफीयांनी संपवलेली आहे ज्या ज्या ठिकाणी रेती घाट दिलेले आहेत  त्या त्या ठिकाणी शेतकरी देशोधडीला लागलेले आहेत.खडकपूर्णा नदीवर मोठे धरण टाकरखेड भागिले या ठिकाणी झालेले असून संपूर्ण पाणी धरणात अडवल्या जाते व नदीचा प्रवाह वरून खंडित झाल्यामुळे रेती बनण्याची प्रक्रिया खंडित झालेली आहे त्यामुळे या परिसरातील रेती उपसा झाल्यास हा संपूर्ण परिसरच वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही शासनाने पेयजल योजनेवर कोट्यावधी रुपयाचा खर्च केलेला आहे त्याही योजना नुसत्या शोभेच्या राहणार आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री मकरंद आबा पाटील, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे, डॉ शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी आणि ठाणेदार यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत.

Copyright ©