Home Breaking News चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालक जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालक जखमी

63

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालक जखमी
साखरखेर्डा lप्रतिनिधी – लव्हाळा साखरखेर्डा रोडवर मोहखेड नजीक लव्हाळा येथून सवडद जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जखमी झाल्याची घटना दि ६ डिसेंबर रोजी दुपारी ३चे वाजेच्या सुमारास लव्हाळा साखरखेर्डा रोडवर मोहखेड नजीक घडली. प्रविण राजेंद्र देशमुख रा सवडद असे ट्रॅक्टर चालकाचे नाव असून तो लव्हाळा येथून ट्रॅक्टर घेऊन सवडद येथे चालला होता. त्याच पाठोपाठ एक कांद्याचा ट्रक येत होता. दरम्यान ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याची माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळताच त्यांनी शेंदुर्जन जवळ ट्रक थांबवून विचारपूस केली असता ट्रकचा दोष नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान जखमी ट्रॅक्टर चालकास चिखली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे





Copyright ©