पिंपळशेंडा शिवारात आढळले अज्ञात इसमाचे प्रेत
डोंगरखर्डा ते पिंपळशेंडा मार्गावर
असलेल्या रपट्या नजीक असलेल्या शेत शिवारात अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याची घटना दिनांक १९जुन रोजीदुपारी एक वाजता उजेडात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर शिवारात शेतात काम करणाऱ्याच्या लक्षात सदर बाब येताच त्यांनी घटनेची माहिती अंतर्गत असलेल्या कळंब पोलीस स्टेशनला दिली.
दरम्यान कळंब ठाणेदार आर. के. राठोड यांच्यासह ताफा घटनास्थळी पोहचला पंचनामा दरम्यान मृत्तकाच्या हातावर पुरुष व महिला अश्या आशयाचे नाव गोंदवून आढळले सदर मृतदेह उलटा पडुन असल्याने स्त्री की पुरुष? असाप्रश्न काहीवेळ पोलीस विभागासमोर उभा ठाकला होता, काही वेळातच एसडीपीओ यांनी घटनास्थळी भेट दिली असता उशीरा पर्यंत सुरू असलेल्या चौकशी अंती सदर प्रेत तृतीयपंथाचे असल्याचा अंदाज पोलीस विभागाकडून देण्यात आला .
सदर खळबळजनक घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील लोकांची एकच गर्दी घटनास्थळी पाहायला मिळत होती.
,मात्र ओळख पटू शकली नव्हती सदर प्रेत या शिवारात कोणी व का आणले असेल? या प्रश्नाची उलट सुलट अधीक चर्चा परिसरात सुरू असुन या मार्गाने ये- जा शेतकरी शेत मजुरात दहशत निर्माण झाली आहे.
दरम्यान एसडीपीओ भैसाने, ठाणेदार आर,के, राठोड, सहाय्यक ठाणेदार भरासकर जया कोटरांगे, गजानन जाधव, गिरीश मडावी, योगेश डोंगरे व इतर पोलीस कर्मचारी यांची घटनस्थळी उपस्थीती होती.
घटनेचा पंचनामा, गुन्ह्याची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती कळंब पोलीसांनी दिली.



