कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या डॉन ला यवतमाळ मधून अटक
माघील दोन वर्षांपासून यवतमाळ शहरातील जाम रोड भागात वास्तव्यास असलेल्या कुख्यात डॉन ला यवतमाळ पोलिसांनी अटक केली दोन वर्षापासून लपून राहत असलेला ३५ वर्षीय भुपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा याला यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्तचरा कडून माहितीच्या आधारे अटक केली. त्याच्यावर राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यात २०२३ साली घडलेल्या खुनाच्या प्रकरणात गुन्हा दाखल असताना फरार होता. येथील हत्ये नंतर तो यवतमाळ मध्ये वास्तव्यास होता.
यवतमाळ पोलिसांना गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की, लॉरेन्स बिश्नोई ग्यांग चा एक सक्रिय सुपारी किलर शहरात वास्तव्यास आहे. त्या माहितीनंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संसशियाच्या हालचालींवर लक्ष ठेवले. पुरावा आणि खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पिक्चर स्टाईल कारवाई करत आरोपीला अटक केली. भुपेंद्र सिंग वर राजस्थान पोलिसांनी २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तो यवतमाळ पोलिस अधीक्षक यांनी राजस्थान पोलिसांशी चर्चा करून या ग्यागस्टार ला राजस्थान पोलिसांचे ताब्यात देणार आहे .



