Home Breaking News कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण दगावले!

कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण दगावले!

93

कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण दगावले!

विठ्ठलवाडी येथील बेसुमार जंगलतोड झाल्याने तो परिसर मैदान झाले जगलात वनविभागाने प्राण्यांसाठी चारा पाण्याची कोणत्याच प्रकारे सुविधा नसल्याने वण्य प्राणी गावाचा आसरा घेत आहे.वन्य प्राणी हे शेजारच्या गावांमध्ये आणि पाणवठ्याजवळ हे प्राणी येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना यवतमाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे रस्त्याच्या कडेला एका हरिणाचे लचके तोडल्याचे काहीना दिसून आले भटक्या कुत्र्यांनी हरणांची शिकार केली पुरेसा चारा आणि पाणी नसल्याने विठ्ठलवाडी कुरण नर्सरी मधील हरणे विठ्ठलवाडी गावाजवळ भटकत आहेत. सोमवारी पहाटे हरीण कुत्र्यांच्या तावडीत सापडली आणि गावठी कुत्रे हरणीच्या मागे लागले परंतु हरीण जीव वाचवत विठ्ठलवाडी रोड चा कडेला पडला आणि कुत्र्याने हरणाचे लचके तोडले. हरीण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र भटक्या कुत्र्यांनी हरणाला रात्रीच आपले भक्ष बनवले 16 तास होऊनही वनविभागाचे एकही अधिकारी घटनास्थळी पोहचले नसल्याने वन्य प्राणी व वन सध्या वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.

यांच्या अकार्यक्षम ते मुळे

दिवसेंदिवस जंगलातले पाणवठे नाहीसे झाले आहे त्यामुळे प्राण्यांना पाणी पिण्यासाठी आपली हद्द ओलांडून बाहेर यावं लागतं त्यामुळे अशा घटना. सतत घडत असल्याचं ग्रामस्थांनी मत व्येक्त केले आहेत. या आधी पाण्यामुळे अनेक प्राण्याचे मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. तर विठ्ठलवाडी जगालात वाघांचा वावर वाढला आहे. विठ्ठलवाडी लोकवस्तिच्या भागात घुसल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. जंगतोड रोखणं, नवीन झाडं लावणं आणि जंगलात पाणवठे निर्माण केले तरच असा संघर्ष रोखता येणार आहे.असे प्रयत्न केले नाहीत तर जंगली प्राणी मानवी वस्तित येण्याचं प्रमाण वाढेल आणि नवीन संकट निर्माण होईल अशी भितीही व्यक्त होतेय.

Copyright ©