वर्धा:- पंकज तडस
श्री.संत केजाजी कॉन्व्हेन्ट घोराड येथे वृक्षारोपण
ज्येष्ठ नागरिक शोभा झाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती
सेलू नजीकच्या घोराड येथील श्री.संत केजाजी प्रि. प्रायमरी कॉन्व्हेन्ट घोराड येथे चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.शाळेचे मुख्याध्यापक तथा संचालक प्रशांत झाडे यांची सदर कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी त्यांची विद्यार्थ्यांना झाडाचे महत्त्व पटवून दिले.वृक्ष हे आपले मित्र असून निसर्गाचा समान समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी नर्सरी , केजी – वन तसेच केजी टू च्या सर्वच विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, शाळेच्या परिसरात बेंबु पाम, सायकस, विद्या , कप्रेसस ,बेल, कळवंत, झेट्रोपा,पेन्सिल आदी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षिका श्वेता झाडे, सुवर्णा पिसे, विद्या वांढरे,शिवानी राऊत,आरती भुरे, सोनू झाडे, शोभा झाडे उपस्थित होते.

