कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी
बाभूळगाव:-आज दिनांक २३ ला प्रताप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाभूळगाव इथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राम चिकणकर, जेष्ठ शिक्षक संजय भितकर, प्रगतिशील प्रताप विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष देवेंद्र आत्राम, उपाध्यक्ष अनिल महाजन, सचिव संजय गजबे, मराठी भाषा विभाग प्रमुख रमेश डबले आदी मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते. सुत्रसंचालन तथा आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण मिरासे व छाया कोरडे यांनी पार पाडले. मंचकावरील संपूर्ण तयारी आश्लेषा पवार व संदिप बेंडे यांनी केली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे जेष्ठ शिक्षक संजय भितकर आणि देवेंद्र आत्राम यांनी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे चरित्र आणि त्याच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यां समोर सांगितली. उपमुख्याध्यापक राम चिकणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवले पाहिजे असे सांगितले. स्वच्छता समिती प्रमुख राजेंद्र जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसर स्वच्छ करून सांगता झाली. याप्रसंगी सुनीता शेळकी, संगीता चव्हाण इत्यादी अनेक मान्यवर हजर होते.



