सदोबा सावळी प्रतिनिधी आशिफ खान
काळी दौलत येथे पत्रकारावर झालेल्या मारहाण प्रकरणी निवेदन
सावळी सदोबा:-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा येथील प्रेस क्लब या पत्रकार संघटनेकडून महागाव तालुक्यातील काळीदौलत येथे झालेल्या हिंसाचाराचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर काही समाजकंटकांनी धक्काबुक्की व मारहाण केले,या घटनेच्या निषेधार्थ सावळी सदोबा प्रेस क्लबच्यावतीने सावळी सदोबा पोलीस चौकी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पत्रकारांना मारहाण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे,दिनांक ३ डिसेंबर रोजी महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे धक्का लागल्याच्या विषयाने एका युवकांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराचे वृत्तांकन करण्यासाठी जय महाराष्ट्र न्यूज चैनल चे संदेश कान्हु व २४ न्यूज चैनल चे सैय्यद फैजान यांच्यावर जमावातील काही समाजकंटकांनी संदेश कान्हु,व सैय्यद फैजान या पत्रकारावर हल्ला करून बेदम मारण्यात आले,आणि त्यांच्या जवळील बुम व मोबाईल हिसकावून घेतल्याची माहिती समोर आली आहे,या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,तसेच घटनेचे गांभीर्य पाहता,स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत तपास करून हल्लेखोरावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी सावळी पोलीस चौकी मार्फत मुख्यमंत्र्यी यांना सावळी प्रेस क्लब संघटनेच्या वतीने एका निवेदनातून देण्यात आले,यावेळी सावळी सदोबा प्रेस क्लबचे अध्यक्ष-रुपेश खरतडे,उपाध्यक्ष राम पवार,सचिव मोहम्मद सर्वे,दुर्गेश कर्नेवार,प्रमोद कोटावर,आसिफ सुमार,सुरेश राठोड, सुरेश पवार,अमिन चव्हाण,रमेश राठोड,जे बी पठाण,श्रीकांत देशमुख, राहुल राऊत,सुरेश राठोड व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते,



