Home Breaking News पैनगंगा नदी पातळी वाढल्याने विदर्भ व मराठवाड्याचा संपर्क तुटला

पैनगंगा नदी पातळी वाढल्याने विदर्भ व मराठवाड्याचा संपर्क तुटला

14

आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम

पैनगंगा नदी पातळी वाढल्याने विदर्भ व मराठवाड्याचा संपर्क तुटला

या मार्गावरील वाहतूक ठप्प पोलिसांचा चोख बंदोबस्त

उर्ध्व पैनगंगा म्हणजेच इसापूर धरण 100 टक्के भरल्यामुळे पाणीसाठा वाढल्याने या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून पैनगंगा नदी ची पातळी वाढल्याने पुलावरुन पाणी वाहत असल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे.
मागील चार ते पाच दिवसापासून मुसळधार पावसामुळे पैनगंगा स्थित इसापूर प्रकल्पात पाणीसाठा वाढत असल्याने तसेच पावसाचा जोर धरणाच्या वरील बाजूसही कायम असल्याने धरणातून पैनगंगा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे पाणी पैनगंगा नदीवरून वाहत असल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला असून यात नांदेड मार्गे यवतमाळ पुसद होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
त्यामुळे वाहनधारकांना दूरच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
धरणातू मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन उमरखेड तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे जिवीत हानी होऊ नये म्हणून नदी काठावरील गावातील नागरिकांनी गुरे-ढोरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षितस्थळी ठेवावे, असे आवाहन इसापूर धरण पूर नियंत्रण कक्ष यांनी केले असून आज दि 29 सप्टेंबर रोजी पैनगंगा नदी फुल झाल्याने त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
त्यामुळे नदीकाठावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Copyright ©