येथील जंगलात चरण्याकरिता गेलेल्या गायीस वाघानी हल्ला करून ठार केल्याची घटना हिवरी परिसरात घडली बापू भिवाजी येवले यांच्या मालकीची 40 हजार रुपये किमतीची गाय मारली असून या पूर्वीही
अनेक गायीचा वाघाने फडशा पाडला सतत वाघाचा परिसरात वावर सुरू असल्याने सर्वसामान्य भयभीत झाले आहे येथील एक दोन दिवसात एक ना एक गायीचा फडशा पाडल्या जात आहे जनावरांना जंगलात प्रवेश करावाच लागतो कारण कुठेही चारा मिळत नाही त्या मुळे जंगलात वाघाचा चारा बनत आहे या कडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे
जंगल हे वन्यप्राण्यांचे घर असुन त्या घरात आपणच अतिक्रमण करीत असुन याची प्रत्येकानी काळजी घेऊन आणि ज्या परिसरात वाघाचे अस्तित्व आहे त्या परिसरात गुराख्यानी व इतर कुणीही जाऊ नये असे आवाहन वनाधिकारी प्रशांत बहादुरे यांनी केले आहे



