यवतमाळ दि. 8 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात राळेगाव येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर चार जण कोरोनामुक्त झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72814 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71017 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2162 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2162 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 776 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.
00000000000000
9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्हयात रानभाजी महोत्सव
यवतमाळ दि.८; रानभाज्यांचे आरोग्य विषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण भागातील नगरिकाना व्हावे, तसेच रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकाऱ्याना आर्थिक फायदा होणेसाठी मागील वर्षी पासुन जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट च्या निमित्ताने रानभाजी महोत्सव राबविण्यात येत आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कृषि विभाग व आत्मा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्हयात रानभाजी महोत्सव जिल्ह्यात साजरा करन्यात येत आहे.
दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी पालकमंत्री ना. संदीपानजी भूमरे यांचे उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर यवतमाळ येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील नागरीकांना विविध प्रकारच्या रानभाज्या,सेंद्रिय भाज्या,कंद भाज्या,बांबू कंद,औषधी वनस्पती पाहावयास व खरेदी करण्यास मिळणार आहे. तरी मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी रानभाजी महोत्सवाला शहरातील नागरीकांनी भेट देवून उस्फूर्त प्रतिसाद द्यावा व शेतकऱ्याना प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) यवतमाळ यांनी केले आहे.
तालुका स्तरावर पुढील नियोजित तारखेला सदर महोत्सव राबविण्यात येईल.
यवतमाळ – 14/08/2021 जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, दिग्रस – 09/08/2021 जूना पेट्रोल पंप जवळ दिग्रस,
घाटंजी 10/08/2021 तहसील कार्यालय परिसर घाटंजी, पुसद – 10/08/2021 छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पुसद,
कळंब- 12/08/2021 प्रशासकीय इमारत सभागृह,कळंब, महागाव – 13/08/2021 तहसील कार्यालय परिसर महागाव,
राळेगाव -13/08/2021 तहसील कार्यालय परिसर राळेगाव, उमरखेड – 13/08/2021 कृषि उत्पन्न बाजार समिती उमरखेड,
दारव्हा – 11/08/2021 तालुका कृषि अधिकारी कार्यालय परीसर, दारव्हा, वणी- 12/08/2021 पंचायत समिती सभागृह वणी, बाभुळगाव – 12/08/2021 पंचायत समिती बाभुळगाव, पांढरकवडा- 13/08/2021 तहसील कार्यालय पांढरकवडा,
आर्णी – 13/08/2021 तालुका कृषि अधिकारी कार्यालय परीसर आर्णी, मारेगाव -11/08/2021 कृषि उत्पन्न बाजार समिती मारेगाव, नेर – 12/08/2021 तालुका कृषि अधिकारी कार्यालय परीसर नेर आणि झरीजामनी तालुक्यात 13/08/2021 रोजी पंचायत समिती परिसर झरी येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.



