Home Breaking News प्रियकराने संपवली आपल्याच प्रियसीची जीवन यात्रा

प्रियकराने संपवली आपल्याच प्रियसीची जीवन यात्रा

10

एका प्रियकराने आपल्या मुलाकडे जाण्याच्या कारणावरून प्रियसीला जंगलात नेऊन दगडाने ठेचून तिचा खून केल्याची घटना किनवट तालुक्यातील वडोली जंगल परिसरात घडली
किनवट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  रामकुमार रामेश्वर भोळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वडोली तालुका किनवट येथील दत्त मंदिराकडे जाणाऱ्या जगातील रस्त्यावर दिनांक 01 जुन रोजी  सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बबीता मंगेश आहे( वय 32) राहणार लसनवाडी तालुका माहुर या महीलेचे प्रेत सापडले तिच्या डोक्यावर दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता .किनवट पोलीसांनी दिलेल्या माहीतप्रमाणे पंकज सुभाष जाधव(वय46) राहणार पालाईगुडा तालुका माहुर ह.मु.सुरदासपुर मंडल नेरडगुंडा जिल्हा आदिलाबाद  याने तिचा खून केला होता  बबीता आहे ही पंकज जाधवची प्रियसी होती (ता.1 जुन)
पंकज जाधवांच्या मुलांना भेटणयासाठी पालाईगुडा ला का येत नाही या कारणावरून प्रियकर आणि प्रियसी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले
या भांडणातून माथेफिरू प्रियकराने तिला दगडाने ठेचून तिचा खून करून टाकला
किनवट पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड सहीतेनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्या कडे सोपविण्यात आला आहे
पोलीसांनी आरोपी पंकज सुभाष जाधवला घटनास्थळावरून अटक केली आहे दरम्यान मयत प्रियसी सोबत भांडण करून खुन केल्याप्रकरणी आरोपीला जमावाने पोलीस येई पर्यत जागेवर रोखुन धरले

Copyright ©