नवविवाहित महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना आर्णी तालुक्यातील लोणी येथे १ जून रोजी रात्री ८ वाजता दरम्यान घडली. रेखा मनोज शिंदे ( २१) असे मुत नवविवाहीत महिलेचे नाव आहे.
नवविवाहितेला अचानक भोवळ आल्याने उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले त्यानंतर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तीला मुत घोषित केले. लोणी येथील नामदेव शिंदे यांच्या मनोज या मुलाशी दोन महिन्यांपूर्वी ७ मार्च रोजी रेखा चा विवाह झाला होता. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पुढिल तपास आर्णी पोलिस करीत आहेत शवविच्छेदन केल्यानंतर लोणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नवविवाहित महिलेच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.



