*यवतमाळ जिल्हात 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त*
जिल्हयात 301 कोरोनामुक्त, 73 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु
जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1921 बेड उपलब्ध
यवतमाळ, दि. 1 जून : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 301 तर 73 जण पॉझेटिव्ह आले असून चार जणांचा मृत्यु झाला. यातील तीन मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 4306 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 73 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4233 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1252 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 579 तर गृह विलगीकरणात 673 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71997 झाली आहे. 24 तासात 301 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 68977 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1768 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 26 हजार 570 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 52 हजार 933 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.49 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.70 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 60 महिला आणि ग्रामीण मधील 65 वर्षीय पुरूष, दारव्हा शहरातील 65 वर्षीय महिला तर खाजगी रुग्णालयात पांढरकवडा तालुक्यातील 84 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे .
पॉझेटिव्ह आलेल्या 73 जणांमध्ये 49 पुरुष आणि 24 महिला आहेत. यात आर्णी येथील 4, बाभुळगाव येथील 0, दारव्हा येथील 4, दिग्रस येथील 4 , घाटंजी 0, कळंब 0, महागाव येथील 1, मारेगाव येथील 6, नेर येथील 5, पांढरकवडा 1, पुसद येथील 9, राळेगाव 0, उमरखेड 3, वणी येथील 9, यवतमाळ 14, झरीजामणी 11 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1921 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 358 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1921 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 106 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 471 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 106 रुग्णांसाठी उपयोगात तर 420 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 146 उपयोगात तर 1030 बेड शिल्लक आहेत.



