मोहाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक बेपत्ता
पोलीसात तक्रार, शोध सुरू
साखरखेर्डा lप्रतिनिधी -येथून थोड्याच अंतरावर असलेल्या मौजे मोहाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर कडुबा काळे हे दि. २० एप्रिल पासून घरून निघून गेल्याने कुटुंबात चिंता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी भाऊ भानुदास कडूबा काळे यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.
कोणताही घरी वाद नसताना अचानक ते २० एप्रिल चे दुपारी कुणाला काही न सांगता घरुन निघुन गेले आहेत. मोबाईल, मोटार सायकल घरीच असल्याने ते घरी न परतल्याने कुटूंबियांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता शोध लागला नाही त्यामुळे काळे कुटूंबियांत तसेच परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. चिखली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरगाव काकडे येथील जिल्हा परिषद शाळेत ते तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. कुणाला दिसून आल्यास पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथे कळवावे असे आवाहन ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले