प्रशासकपदी माजी सैनिकांची नियुक्ती करा!युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी शिराळे पाटील यांची मागणी
चिखली lप्रतिनिधी
राज्य शासनाद्वारा कार्यकाळ पूर्ण झालेल्या मात्र निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायत मध्ये प्रशासकपदी सरपंच तथा तत्सम व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते.
ती नियुक्ती करण्यात येऊ नये. त्यांच्याजागी देशासाठी अहोरात्र देशसेवा केलेल्या माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात यावी.
जेणे करून सैनिक हा प्रामाणिक असतो जीव जाईल पण वचन त्याचं जाणार नाही ज्याअर्थी देशासाठी झटलेले सैनिक हे गावासाठी पण प्रामाणिक विकासात्मत कामे करतील
त्यामुळे कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक पदी माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात असे
निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आले आहे.
माजी सैनिक हे देखील या भारत मातेचे देशासाठी तळहातावर शीर घेऊन लढलेले थोर सुपुत्र असून त्यांनी देखील आपल्या कार्यकाळामध्ये भारतमातेची सेवा केलेली आहे
देशाप्रती अपारनिष्ठा प्रामाणिकपणे कार्य करण्याची शिस्त अंगी बाळगलेली असल्यामुळे प्रशासकपदी या व्यक्तीची नियुक्ती झाल्यास ग्रामपंचायत मध्ये होत असलेला गैरकारभार रोखण्यासाठी मदत होईल
यात कुठलीही शंका नाही त्याचबरोबर माजी सैनिकांना सन्मान देखील मिळेल असे वाटते त्यामुळे या पदी माजी सैनिकांची नियुक्ती करावी व तसा आदेश शासनामार्फत काढण्यात यावा असेही निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी येवासेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी शिराळे पाटील, उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, भास्कर कुठे, रवींद्र काकडे, अमर सुसर, भीमराव सवडे ,साहेबराव भंडारे , अमोल ढोरे, राकेश चोपडा,अनिल सवडे ,नामदेव सुरडकर, विद्यासागर डोंगरदिवे ,अमर काळे, अभी वीर ,योगेश गवई, संकेत इंगळे ,संकेत तायडे उपस्थित होते.
Comments




