Home Breaking News क्षुल्लक कारणावरून आपसातील दोन गटात तुंबळ हाणामारी

क्षुल्लक कारणावरून आपसातील दोन गटात तुंबळ हाणामारी

27

क्षुल्लक कारणावरून आपसातील दोन गटात तुंबळ हाणामारी
सरपंचपती, बाजार समिती सभापतीससह परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल एक अटकेत पाच जखमी
साखरखेर्डा lप्रतिनिधी – येथून थोड्याच अंतरावर असलेल्या मौजे गुंज येथे डिजेच्या क्षुल्लक कारणावरून आपसातील दोन गटात शिवजयंती मिरवणुकीत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री ९९वा घडली. दरम्यान सरपंचपती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश माधवराव तुपकर, सभापती अनिल मुरारी तुपकर यांच्या परस्पर विरोधी तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून एकास अटक करण्यात आली आहे तर पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून इतर आरोपी फरार आहेत.
दरम्यान अनिल मुरहारी तुपकर वय 51 वर्ष व्यवसाय शेती रा.गुंज (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदखेडराजा) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १ अमोल सुरेश तुपकर 2) सुरेश माधवराव तुपकर 3) ऋतिक गजानन तुपकर 4) श्याम सुरेश तुपकर 5) गजानन केशव तुपकर 6) कार्तिक आनंथा तुपकर 7) समर्थ गणेश तुपकर
8) चेतन गणेश तुपकर 9) आनंथा केशव तुपकर 10) कडुबा मनोहर तुपकर 11) पवन परसराम तायडे 12) अक्षय पप्पु तुपकर 13) प्रथमेश रमेश तुपकर 14) रमेश माधवराव तुपकर या चौदा आरोपींनी शिवजयंतीची डि जे मिरवणूक माझ्या घरासमोरून जात असताना माझ्या घरात अॅजिओप्लॅस्टी झालेला पेशंट आहे. डिजे वाजवू नका अशी विनंती केली असता उपरोक्त चौदा जणांनी घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली अशा तक्रारीवरून पोलिसांनी अ प नं 076/2026, अधिनियम कलम भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 118(1),118(2),191(2),191(3),125(B),333,351(2),352 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील कार्तिक अनंता तुपकर यास पोलिसांनी अटक केली आहे तर सुरेश माधवराव तुपकर (माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा सरपंचपती) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अनील मुरहरी तुपकर वय ५० वर्षे २. मुरहरी बाजीराव तुपकर वय ७५ वर्ष ३. अशोक मुरहरी तुपकर वय ६० वर्ष, ४.विठठल जनार्दन तुपकर वय ४५ वर्ष ५. योगेश रामचंद्र तुपकर वय ४१ वर्ष सर्व रा.गुंज ता. सिंदखेडराजा यांनी शिवजयंती मिरवणुक सुरु असतांना पुतण्या ऋतिक गजानन तुपकर यास त्याचे घराजवळ रोडवर आरोपी अनील मुरहरी तुपकर हे मारहाण करीत आहेत. त्यानंतर मी मिरवणुकीचे ठिकाणी
गेलो आणि पाहिले असता आरोपी मुरहरी बाजीराव तुपकर यांचे हातात काटेरी काठी होती आणि ते काठीने समर्थ गणेश तुपकर यास मारत असतांना मी काटेरी काठी धरली असता सदर काठी फिर्यादीचे हातास तसेच दाढीवर लागली त्यामुळे हातास व दाढीस मार लागून जखम झाली आहे. तेव्हा तेथे आरोपी अशोक मुरहरी तुपकर हा आला त्याचे हातात वेळुची काठी होती. तेव्हा मी मुलांना बाजुला करु लागलो असता आरोपी अशोक तुपकर याने अक्षय पप्पु तुपकर याचे डोक्यात काठी मारली त्यात त्याचे डोके फुटल्यानंतर आरोपी अनिल मुरहरी तुपकर, विठठल जनार्दन तुपकर, योगेश रामचंद्र तुपकर हे हातात
लाठ्याकाठ्या घेवून मारायला धावत आले. तेव्हा वाद वाढेल म्हणून गावातील जगदीश रामकृष्ण तुपकर, विनोद यांनी आम्हाला तिथून आमचे घरी आणले अशा तक्रारी वरून पाच जणांवर अप क्र व कलम -077/2026 कलम ११८ (१), १९१ (२), १९१(३) भारतीय न्याय संहिता नुसार पाच जणगुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दोन्ही गटांतील जखमी पाच जणांवर उपचार सुरू असल्याचे समजते. दोन्ही गट आपसातील असून यापूर्वी देखील दोन्ही गटांवर साखरखेर्डा पोलीसात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे जुन्या क्षुल्लक कारणावरून ही हाणामारी झाल्याचे दिसून येत आहे.

Copyright ©