संत गजानन महाराज प्रकटदिनी गावंडे दाम्पत्याचे वतीने पाच हजार भाविकांना महाप्रसाद टाळमृदंगाच्या गजरात निनादले शहर साखरखेर्डा- वार्ताहर – काही नाही आता,माझे मागणे तुजला
ठेविल चरणाला जन्मोजन्मी
उप्रोल्लीखीत अभंगाला साक्षी ठेवून साखरखेर्डा येथे संत गजानन महाराज प्रकट दिनोत्सव टाळ मृदंगाच्या. निनादात साजरा करण्यात आला. स्व भास्करराव शिंगणे कला प्रा नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयात सकाळी प्राचार्य डॉ बाळासाहेब गावंडे, नगरसेविका प्रा डॉ सौ मीनलताई गावंडे, नेहरू युवा क्रिडा व सांस्कृतीक मंडळाच्या संचालिका कु इशा निलेश गावंडे, क्रिश निलेश गावंडे यांच्या हस्ते पुजा झाल्यानंतर जवळपास पाच हजार भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.दरम्यान रांगेत प्रसाद घेणाऱ्या प्रत्येक भाविकांचा रुमाल टोपी देऊन सत्कार केला. पाच क्विंटल गहू आणि एक दोन क्विंटल वांग्याच्या भाजीचा दरवर्षी गावंडे दाम्पत्याच्या वतीने महाप्रसाद तयार करण्यात येतो. महाविद्यालयाच्या प्रवेश व्दारावर गेल्या अठरा वर्षांपूर्वी डॉ गावंडे यांनी संत गजानन महाराजांचे प्रशस्त मंदिर उभारले आहे. गावंडे कॉलेज ऑफ फॉर्मसी आणि महाविद्यालयीन कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
<span;> दरम्यान साखरखेर्ड्यात खालचे बसस्टॉपवर भाविकांना तर संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त सप्ताह आयोजित करण्यात आला होता त्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. दरम्यान साखरखेर्डा येथे भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. दिंड्या पताकांनी रस्ते फुलून गेले होते सवडद, गोरेगाव, गुंज, अशा अनेक गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता त्याची सांगता आज झाली.