Home Breaking News यवतमाळ येथे अवैध शस्त्र साठा जप्त 

यवतमाळ येथे अवैध शस्त्र साठा जप्त 

105

यवतमाळ येथे अवैध शस्त्र साठा जप्त 

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची शस्त्रसाठ्याच्या विरोधात मोठी कारवाई करत दोन ठिकाणी टाकले छापे यात दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पाच रायफल, अग्निशस्त्रे, धारदार तलवार, ३५० जिवंत काडतुसे, बुलेटप्रूफ जॅकेटसह एकूण १२ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

पहिल्या घटनेत रणवीर वर्मा (३०, रा. दर्डा नगर, यवतमाळ) हा पांढरकवडा रोडने मोपेडने जात असताना पोलिसांनी त्याला अडवून झडती घेतली. त्याच्याकडील पोत्यात पाच अग्निशस्त्रे, ३५० जिवंत काडतुसे, एक तलवार, बुलेटप्रूफ जॅकेट व इतर साहित्य आढळून आले. या कारवाईत ७ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रणवीर याने ही शस्त्रे कामरान अहमद (रा. देहरादून, उत्तराखंड) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. कामरान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात दिल्लीसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

दुसऱ्या घटनेत मो. अश्फार उर्फ भाया (३५, रा. तेलीपुरा, यवतमाळ) हा चारचाकी वाहनात पंप अ‍ॅक्शन गन घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपूर-तुळजापूर महामार्गावर सापळा रचून त्याला अटक केली. वाहनाच्या डिकीतून पंप अ‍ॅक्शन गन व ५ जिवंत काडतुसे सापडली. या कारवाईत ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पो.नि. सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि संतोष मनवर, निलेश राठोड, रितुराज मेडवे, प्रशांत हेडाऊ, सचिन घुगे, आकाश सहारे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली तर यात मोठे रॅकेट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिस याचा छडा लावेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Copyright ©