Home Breaking News कळंब तालुक्यातही शिक्षण क्षेत्रात बोगस भरत्या

कळंब तालुक्यातही शिक्षण क्षेत्रात बोगस भरत्या

68

कळंब तालुक्यातही शिक्षण क्षेत्रात बोगस भरत्या

4 जागा भरणारी शिक्षणसंस्था एसआयटी च्या रडार वर चवनेंच्या काळात भरल्या होत्या 4 जागा

कळंब. बनावट शालार्थ आयडी आणि बॅक डेट शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर मोठी टाच आली आहे.एसआयटी कडून या शिक्षण क्षेत्रातील बनावट भरतीचा पोळा फोडण्यात आला आहे. मात्र आता या प्रकरनाचे धागेदोरे कळंब तालुक्यात देखील पोहोचले आहे. तालुक्यातील एका शिक्षण संस्थेने काळे “धंदे ” करून आपली ” शक्ती ” पणाला लावत चवनेंच्या काळात प्रत्येकी 30 लाख रुपये घेऊन 4 कर्मचाऱ्यांच्या बॅकडेट नियुक्या केल्या आहे. त्यामुळे ही संस्था शासनाणे नेमलेल्या एसआयटी च्या रडारवर आली आहे.

महाराष्ट्रासह, यवतमाळ जिल्ह्यात आर्थिक देवाणघेवानीतुन झालेल्या बनावट शालार्थ आयडी व बॅक डेट नियुक्त्यांचा मोठा भंडाफोड एसआयटीने केला आहे.त्याच प्रकरनातं चौकशी अंती अनेक उलगडे होताना दिसत आहे. या प्रकरनाचा केंद्रबिंदूच आता यवतमाळ जिल्हा असल्याचे पुढे येत आहे.त्यातच यवतमाळ येथून बदली झालेल्या चिंतामण वंजारी यांना नागपूर येथून अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्यावर आता कारवाई ची टांगती तलवार आहे. दरम्यान या बनावट भरतीमध्ये कळंब सह कोठा, बाभुळगाव, वेणीसह इतर ठिकाणी शिक्षण क्षेत्रात प्रस्थ असलेल्या त्या एका “संस्थेने ” मोठा मलिंदा लादला आहे.2018,19 च्या काळात कळंब तालुक्यातील त्या संस्थेने 4 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे भरली, या साठी उमेदवारांकडून प्रत्येकी 30 लाख रुपये घेण्यात आले. जुन्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा नियम असताना या संस्थेने महादेवाची ” शिवशक्ती ” पणाला लावून 2 लिपिक व 2 प्रयोगशाळा सहाय्यकांच्या नियुक्त्या केल्या. ह्या चारही नियुक्त्या चवनेंच्या कार्यकाळात झाल्या असून चारही बॅक डेट असल्याची खात्रीलायक माहिती आहे.शासनाची शिक्षक भरती बंद असताना या संस्थेने वरिष्ठ अधिकार्यांच्या मदतीने ह्या जागा भरल्या आहे. त्यामुळे या संस्थेने भरलेल्या चार जागांची एसआयटी कडून चौकशी झाल्यास तालुक्यात तील शिक्षण क्षेत्रात मोठे घबाड उघड होणार आहे. असे झाल्यास पवित्र असलेल्या पोर्टल ला आपल्या ” शक्ती” च्या भरवश्यावर “अपवित्र ” करू पाहणाऱ्यांचे काळे ” धंदे ” देखील उघडे पडणार आहे.

Copyright ©