कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांने केली विष प्राशन करून आत्महत्या
(या महिन्यातील विष प्राशन करून आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना)
सावळी सदोबा :-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील सुधाकरनगर (चौफुली) येथील 45 वर्षीय शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना काल रात्री उघडकीस आली,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव कुंदन तुकाराम पवार वय 45 वर्षे असून,त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची चार एकर शेती आहे,आणि सदर शेतीवर बँक ऑफ महाराष्ट्र सावळी सदोबा या शाखेचे कर्ज असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले,मृतक शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या शेतात विष प्राशन करून केले,त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,उत्तरीय तपासणी करून त्यांच्या पार्थीवर त्यांच्या गावी अंतिम संस्कार करण्यात आले,कुटुंबातील सदस्यांच्या माहितीनुसार,कुंदन पवार हे कायमच कर्जाच्या विवंचनेत अडकले होते.बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे कर्ज आणि शेतीतील नापिकीमुळे त्यांचा मानसिक आणि आर्थिक तणाव वाढला होता असे त्यांच्या पत्नीने सांगितले की,कर्जाच्या आणि नापिकीच्या ओझ्यामुळे पती निराश झाले होते, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांने सांगितले,मृतक शेतकऱ्यांच्या मागे पत्नी,मुलगा,मुलगी असा मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या निधनाने कुटुंबाचा आधार गेल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.



