दुरुस्त केलेल्या अंगणवाडीत पुन्हा गळते पाणी विद्यार्थ्यांना राहावे लागत आहे घरीच
यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत हिवरी येथील वॉर्ड क्र.३ मधील अंगण वाडीची दुरुस्ती नुकतीच करण्यात आली दुरुस्ती करिता लाखो रुपये खरचं करण्यात आले ते पैसे दुरुस्ती करिता खरचं झाले की दुरुस्त करणाऱ्याच्या घशात गेले असा प्रश्र्न निर्माण झाला आहे अंगण वाडीत येणाऱ्या चिमुकल्यांना बाहेरूनच परतावे लागते कारण बसायला जागाच नाही अंगणवाडी मध्ये ठेवण्यात आलेला आहार हि ओला झाल्याने मुलांना द्यायचं तर काय ? ज्या ठिकाणी आपले किंवा आपल्या नातेवाईकांचे मुले ज्या ठिकाणी जातात त्याच ठिकाणी गैर प्रकार होत आहे तर इतर कामात किती असेल या वरुन स्पष्ट होत आहे हि बाब गंभीर असतानाही या कडे कुणाचेही लक्ष नाही हि शोकांतिका आहे.विकास कामांच्या नावावर केवळ पैसे उकळण्याचा प्रकार सुरू या कडे संबधित वरिष्ठ अधिकारी हि दुर्लक्ष करीत असल्याने गैर प्रकाराला वाव मिळत आहे.



