सार्वजनिक शौचालय व मुत्रिघर विषयी उघडत नव्हते आरोग्य निरीक्षकांचे कान, न.प.मुख्य अधिकाऱ्यांच्या टेबलावरच आणून टाकली घाण !
भाजपा कार्यकर्त्या कल्पना पवार झाल्या आक्रमक
दिग्रस शहराचा एकीकडे विकास होत आहेत परंतु दुसरीकडे शहरांमध्ये शौचालय आणि मुत्रीघर असून नसल्यासारखी परिस्थिती आहे . विशेष म्हणजे महिलांसाठी तर मुत्रीघर नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या कामगार आघाडीच्या कल्पना मधुकर पवार ह्या आक्रमक झाल्या असून आज त्यांनी अक्षरशा नादुरुस्त असलेल्या शौचालयातील घाण मुख्याधिकारी, बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या टेबलावर आणून टाकली याआधी अनेक वेळा सार्वजनिक शौचालय मुत्रीघर जागी जागी निर्माण व्हावे तसेच चालू स्थितीत मुत्रीघर असावे असे अनेक वेळा कल्पना पवार यांनी निवेदन दिले असताना सुद्धा नगरपरिषद मार्फत कुठलीही कारवाई झाली नाही याला कंटाळून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य कल्पना पवार यांनी आज अक्षरशा शौचालयातील घाण ही मुख्याधिकारी यांच्या टेबलवर टाकून एक नवीन आक्रमक पवित्रा घेतला आहे लवकरात लवकर जर सार्वजनिक शौचालय आणि मुत्री घरे निर्माण झाले नाही तर नगरपरिषद पुढे आमरण उपोषण करणार असे निवेदनातून म्हटले आहे यावेळी मुख्याधिकारी गैरहजर होते परंतु नगर परिषद चे लेखा परीक्षण (ऑडिट) करण्यासाठी यवतमाळ ची टीम उपस्थित होती त्यांच्या समक्ष कल्पना पवार यांनी शौचालयाची घाण मुख्याधिकारी तथा बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या टेबलवर आणून टाकले लाखो रुपये खर्च करून शौचालय मुत्रीघर बांधल्या जाते दरवर्षी देखरेखिला सुद्धा भरमसाठ पैसा शासनाकडून मिळत असतो परंतु या पैशाचा दुरुपयोग होत आहे अशा प्रकारे स्वच्छ भारत अभियानाचा बट्ट्याबोळ झाला व सार्वजनिक शौचालय मुत्रीघर या नावाने नगरपरिषद दिग्रस दरवर्षी सरकारकडून पैशाचा अपव्यवहार करत असल्याचा आरोप कल्पना पवार यांनी आपल्या निवेदनात केला आहे याआधी जी शौचालये बांधली गेली ती नगरोत्थान या मथळ्याखाली बांधली गेली परंतु आता वारंवार नगरोत्थान या मथळ्याखाली नवीन शौचालयाला अनुदान मिळणे शक्य नसल्यामुळे मोबाईल शौचालय शासनाकडून उपलब्ध झाले आहे ते आम्ही लवकरच चौकात बसवून नागरिकांच्या सुविधेसाठी सज्ज करू तसेच आज जी घटना घडली तर यावर कल्पना पवार यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करू
मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवणे



