Home Breaking News त्याच्या मृत्यूला मित्रच ठरला कारणी भूत

त्याच्या मृत्यूला मित्रच ठरला कारणी भूत

15

त्याच्या मृत्यूला मित्रच ठरला कारणी भूत

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घोडखिंडी येथील अल्प भूधारक शेतकरी गणेश भगवान महाजन वय 50 यांनी आपल्या कडे असलेल्या साडेपाच एकर जमिनीवर विदर्भ कोकण बँकेचे एक लाख रुपये कर्ज घेतले कर्ज घेताना त्यांचे मित्र उल्हास मधुकर पाटील यांनी जमानत घेतली होती,त्या अनुषगाने कर्जाची परत फेड करण्यासाठी उल्हास पाटील हा गणेश महाजन यास सतत तगादा लावत होता,तर शिवीगाळ करून मारहाण पण करत होता उल्हास पाटील यांच्या जाचाला कंटाळून गणेश महाजन यांनी घरात आड्याला दोर बांधून फाशी घेतली तर खिशात चिठ्ठी हि लिहून ठेवण्यात आली मृतक यांच्या पत्नी सुशीला गणेश महाजन यांच्या तक्रारीवरून 306 गुन्हा दाखल करण्यात आला असून यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन उपनिरीक्षक गोपाल उताणे तपास करीत आहे

Copyright ©