यवतमाळ प्रतिनिधी पुरुषोत्तम कामठे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किती बळी घेणार,व रुग्णालयात जननी सुरक्षा झाली, असुरक्षा
यवतमाळ:-येथील श्री वसंतराव नाईक वैद्यकीय शाकीय महाविद्यालय व रुग्णालंय या ठिकाणी शिकाऊ डॉक्टरांच्या अर्धवट शिक्षना पायी गरोधर महिलांचे बळी जात आहे,तर यात मोठा हलगर्जी पना होत असल्या मुळे या अगोदर सुद्धा अनेक जननी व शिशुंचा बळी गेल्याचे उदाहरण आहे. व आज पुन्हा या डॉक्टरांनि एक बळी घेतला आज दी 22 मार्च 2023 रोजी पायल सचिन परसगाये वय 23 रा. कचराळा ता. भद्रावती जी चंद्रपूर येथील गर्भवती माता आपल्या माहेरी प्रसूती साठी आली असता पायल ला शासकीय महा व रुग्णालंय यवतमाळ येथे प्रसूती साठी दाखल करण्यात आले होते परंतु डॉक्टरांनि प्रसूती दरम्यान पायल चा जीव गेला परसगाये परिवारात आनंदाचे वातावरण असता ना अचानक दुःखाचा पहाड कोसळला नव वर्षाच्या पर्वावर दुःखाचे डोंगर तयार झाले याचे डॉक्टरांना मात्र काहीच सोयर सुतक नाही, मृतकाचे नातेवाईक म्हणताहेत येथील डॉक्टर प्रसूती नाही तर जणनी शिशूंची हत्या करित आहे,यांना भावनाच राहिल्या नाही स्वार्थापायी दुसऱ्याचे बळी या ठिकाणी घेतले जातात असे बोलल्या जात आहे. येथील सतत मृतिव ला खरे कारणीभूत सिनिअर डॉक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे, कारण या डॉक्टचे आपले मोठ मोठे खाजगी रुग्णालंय चालवण्यात इतके व्यस्त झाले आहे .की शासकीय महा व रुग्णालया कडे लक्ष द्यायला यांना वेळच मिळत नाही आणी शिकाऊ डॉक्टर शिक्षणाच्या नावा खाली जननी शिशुची एक प्रकारे हत्या करित असल्याचे बोलल्या जात आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात जननी शिशूंचे जीव जात असूनही वैधिकीय प्रशासन अधीक्षक आणी अधिष्ठातांचे गप्प का? असा सवाल सर्व सामान्यांना पडत आहे.
डॉक्टरांच्या खाजगी वैध्यकीय व्यवसायावर अंकुश का लावल्या जात नाही .या डॉक्टरांवर कार्यवाही का केल्या जात नाही आहे.अशे प्रश्न जन्सामण्यान कडून करण्यात येत आहे.



