Home Breaking News कळंब’ येथील तरुणास चाकू व हाथोड्याने वार करून खून !

कळंब’ येथील तरुणास चाकू व हाथोड्याने वार करून खून !

12

कळंब’ येथील तरुणास चाकू व हाथोड्याने वार करून खून !

 

खूनाच्या निषेधार्थ कळंब बंद तर राष्ट्रीय महामार्ग केला बंद.

 

कळंबः शहरातील अत्यंत गजबजलेला चौक म्हणून इंदिरा चौकाची ओळख आहे.याच वर्दळ असलेल्या चौकात,आश्विन नामक तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली कळंब शहरात वर्दळीच्या ठिकाणी चौकात आश्विन यास घेरून त्याचेवर शस्त्राने हल्ला करून त्याला जीवानिशी ठार मारणे ही बाब अत्यंत धक्कादायक आहे.

 

कळंब येथील इंदिरा चौकात आज दि.16 जानेवारी रोजी साडेसात ते पाऊने आठ वाजताच्या दरम्यान तीन ते चार अज्ञात मारेकऱ्यांनी मृतक अश्वीन उर्फ अब्दुल राऊत वय (25) हलबिपूरा येथील रहिवासी असून तो शहरातील इंदिरा चौकात उभा होता. यावेळी चौकात सायंकाळी 7.30 ते 8 वाजताच्या दरम्यान अज्ञात तीन ते चार मारेकऱ्यांनी येवून अश्विन नामक युवकावर चाकू व हाथोडीने अचानक हल्ला करून पोटावर व छातीवर सपासप वार करीत त्याला गंभीर जखमी,तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळताच अज्ञात मारेकरी तेथून पळून गेले

 

मृकत हा चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडून असताना नागरिकांनी त्याला शासकीय रुग्णालयात भरती केले असता तेथील डॉक्टरांनी अश्विन यास मृत घोषित केले. सदर खून हा

जुन्या वादातून झाला असल्याची संपूर्ण शहरात चर्चा असून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या खुनातील आरोपी अजूनही फरार च असल्याने पोलीस युद्ध पातळीवर शोध घेत आहे. आरोपींचा शोध घेत आहे

Copyright ©