घाटंजी प्रतिनिधी अमोल नडपेलवार
वाघाडी नदीवर पोहायला गेलेला ऋतिक चा नदीत बुडून मृत्यू
घाटंजी: वाघाडी नदीत पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना काल दि. २७ ला घडली दुपारी तीन साडेतीन वाजता च्या दरम्यान घडली. ऋतिक मनोज शेंद्रे वय १५ असे मृतक मुलाचे नाव आहे. स्थानिक श्री समर्थ विद्यालय घाटंजी येथे तो वर्ग आठवीला शिक्षण घेत होता.
मनोज शेंद्रे यांचे चिरंजीव ऋतिक काल तीन साडेतीन – चार दरम्यान वाघाडी नदीवर पोहण्यासाठी गेला मात्र घरी परतलाच नाही. रात्री दोन वाजेपर्यंत परिवारातील व्यक्ती व सहकारी मित्रांनी नदी पात्रात व परिसरात शोध घेतला असता तो दिसुन आला नाही. मात्र त्याचे कपडे नदी काठावर आढळून आले होते. दि. २८ ला सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान त्याचे शव नदीपात्रात पाण्यावर तरंगताना दिसुन आले. पोलीस उपनिरीक्षक विलास सिडाम व पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.



